Join us

लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध दिग्दर्शकाचं मार्मिक ट्वीट, म्हणाले, 'ओंगळवाणा भडिमार...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 5:19 PM

'पैशांच्या जोरावर पुढचे दोन तीन महिने...' काय आहे दिग्दर्शकाची पोस्ट?

निवडणुकांचा हंगाम जवळ आला आहे. लवकरच लोकसभेची निवडणूक असून आचारसंहिताही लागू होणार आहे. उद्या निवडणूक आयोगाची यासंदर्भात पत्रकार परिषद आहे. २०२४ च्या या लोकसभा निवडणूकीत कोण बाजी मारणार यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने तयारी करत आहे. निवडणूक म्हणलं की पैशांची उधळणही होतेच. यावरच एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने बोट ठेवत मार्मिक पोस्ट केली आहे.

लोकसभा निवडणूकांसाठी (Loksabha Elections) सध्या जागोजागी प्रचार सुरु आहे. उमेदवारांची यादीही जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. जिकडे तिकडे जाहिरातीच दिसत असल्याने एका प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस (Sameer Vidwans) यांनी मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. ते लिहितात, "सगळ्या FM चॅनल्सवरच्या कंटाळवाण्या जाहिराती पुढचे २, ३ महिने डोक्यात ही जाणार!सुरुवात तर झालेली आहेच. अतोनात पैशाच्या जोरावर ओंगळवाणा भडिमार.. ज्याकत्याक" अशी पोस्ट करत त्यांनी या जाहिरातींवरुन आणि सध्याच्या राजकारणावरुन टीका केली आहे. 

समीर विद्वांस फक्त मराठीतच नाही तर हिंदीतही सक्रीय आहेत. कार्तिक आर्यन आणि किआरा अडवाणीला घेऊन त्यांनी 'सत्यप्रेम की कथा' सिनेमा बनवला होता. या सिनेमाचं खूप कौतुक झालं. याशिवाय त्यांनी मराठीत 'आनंदी गोपाळ', 'टाईम प्लीज', 'डबल सीट' या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. त्यांच्या प्रत्येक सिनेमांची नेहमीच चर्चा असते. दिग्दर्शनाशिवाय ते उत्तम लेखकही आहेत.

टॅग्स :समीर विध्वंसलोकसभा निवडणूक २०२४जाहिरातभाजपाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस