Join us

मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्रीला ओळखलंत का?, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 06:30 IST

या अभिनेत्रीने हिंदी मालिकेतही काम केलं आहे.

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. प्रार्थनाला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात.

प्रार्थनाने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो तिच्या बालपणीचा आहे. हा फोटो शेअर करून तिने म्हटले की, बालपणीच्या जादूवर विश्वास ठेवा. तुमच्यातील निरागसता कधीही हरवणार नाही.

प्रार्थना सध्या आपल्याला खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. ती तिच्या कुटुंबाला पहिले प्राधान्य देत असून जास्तीत जास्त वेळ हा तिच्या पतीसमवेत घालवत आहे. प्रार्थनाचे लग्न अभिषेक जावकरसोबत गेल्या वर्षी झाले. त्यांनी गोव्यात अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींच्या आणि नातलगांच्या उपस्थितीत लग्न केले.

अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.

प्रार्थनाने 'पवित्र रिश्ता' या प्रसिद्ध हिंदी मालिकेद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिची पहिल्याच मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

त्यानंतर तिने 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. प्रार्थनाने मालिका आणि रुपेरी पडद्यावरील आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केली आहे.

टॅग्स :प्रार्थना बेहरे