Join us

'ही' अभिनेत्री आहे संदिप खरे यांची मुलगी कोणालाही माहीत नव्हते, तिचे नाव ऐकून चकित व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 09:00 IST

श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित  २०१२ साली प्रदर्शित झाला 'चिंटू' आणि  २०१३ साली प्रदर्शित झालेला 'चिंटू 2' या दोन्ही सिनेमाला प्रचंड पसंती मिळाली होती.

''आयुष्यावर बोलू काही'' कार्यक्रमातून रसिकांच्या मनात घर करणारे संदीप खरे आणि सलील कुलकर्णी या जोडीने rरसिकांचे मनोरंजन केले आहे. 'अग्गोबाई ढग्गोबाई', 'कधी हे कधी ते', 'तुझ्यावरच्या कविता', 'आरस्पानी' हे त्यांचे कविता संग्रहही प्रसिद्ध आहेत. आयुष्यावर बोलू काही हा त्यांचा कार्यक्रम खूपच लोकप्रिय झाला होता. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी आज प्रचंड लोकप्रिय आहेत.

सलील कुलकर्णी  यांच्या प्रमाणेच संदिप खरे यांचा प्रचंड मोठा त्यांचा चाहता वर्ग आहे. त्यांच्याविषयी जाणून घेण्यात त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. सोशल मीडियावरही ते सक्रीय असतात. कुटुंबासह खास फोटो व्हिडीओ ते शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोंवर चाहतेही भरभरुन कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्यावर चाहत्यांच्या नजरा नेहमीच खिळतात. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे. 

संदिप खरे यांची लाडकी लेक रुमानी खरे. रुमानी खरे दिसायलाही खूप सुंदर आहे.पण तुम्हाला माहिती आहे का ? रुमानीसुद्धा तिच्या बाबांप्रमाणेच प्रसिद्ध चेहरा बनली आहे. रुमानीला अभिनयाची प्रचंड आवड आहे. श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित  २०१२ साली प्रदर्शित झाला 'चिंटू' आणि  २०१३ साली प्रदर्शित झालेला 'चिंटू 2' या दोन्ही सिनेमाला प्रचंड पसंती मिळाली होती. सिनेमातल्या लहानग्यांच्या भूमिकाही चाहत्यांना तितक्याच भावल्या होत्या. या दोन्ही सिनेमात रुमानीसुद्धा झळकली होती. रुमानी बालकलाकार म्हणून तिने काम केले होते. रुमानीला अभिनयासोबतच कथ्थकचीही आवड आहे. कथ्थकचे रितसर प्रशिक्षणही तिने घेतले आहे. 

इतकंच काय तर नाटाकतही रुमानीने काम केले आहे. २०१९ साली “आई पण बाबा पण” हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या नाटकात  रुमानी खरे महत्वाच्या भूमिकेत होती. तर कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांतून तिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

रुमानीच्या सोशल मीडियावर पेजवर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील. प्रत्येक फोटोतील अदा चाहत्यांच्याही तितक्याच पसंतीस पात्र ठरतात. सोशल मीडियावर रुमानीचा प्रचंड मोठा चाहता वर्ग असल्याचे तुम्हाला जाणवेल.

टॅग्स :संदीप खरेसलील कुलकर्णी