मराठी सिनेसृष्टीत तुफान नेम आणि फेम मिळवलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत येत असते. दिवसेंदिवस प्राजक्ता यशाचं शिखर गाठत आहे. मालिका आणि सिनेमांमधू ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. पण, तुम्हाला माहिती आहे का आज लाखो रुपये कमवत असलेल्या प्राजक्ताची पहिली कमाई किती होती?. तर स्वत: त्याच्या पहिल्या कमाईबद्दल अभिनेत्रीनं खुलासा केला.
नुकतेच एका मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या पहिल्या मानधनाबाबतचा खुलासा केला आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत पहिली कमाई किती होती, यावर उत्तर देताना ती म्हणाली, 'मी खूप लहानपणापासून काम करत आली आहे. सहावी ते सातवीत असताना मी खूप डान्सचे कार्यक्रम केले होते. त्यावेळी मला कमी पैसे मिळायचे. ‘तांदळा एक मुखवटा’साठी तब्बल चार हजार रुपये मिळाले होते. ही इंडस्ट्रीतली माझी पहिली कमाई होती'.
पुढे ती म्हणाली, 'मला ‘गुड मॉर्निंग महाराष्ट्रा’साठी दर महिन्याला ५८ ते ६० हजार रुपये मिळायचे. या पैशांतून माझा प्रवास खर्च, माझे शिक्षण व माझा इतर खर्च भागत होता. या पैशांतून मी घरी खर्चालाही पैसे देत होते, त्यामुळे त्या कमाईतून मला आनंद झाला होता'.
प्राजक्ता ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. प्राजक्ताचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. प्राजक्ता ही फक्त अभिनेत्री नसून आता ती उद्योजिका म्हणून नवं काम सुरू केलं आहे. तिचा प्राजक्तराज हा तिचा दागिन्यांचा ब्रँड आहे.
अनेकदा ती तिच्या फोटोशूटमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करते, त्याबरोबरच मजेदार कॅप्शनही देते. मराठी मालिकांमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी नावारुपाला आली. तर ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे सूत्रसंचालिका म्हणून तिला एक वेगळी ओळख मिळाली. कितीही ग्लॅमरस आणि प्रसिद्ध सेलिब्रिटी असली तरी तिची आपल्या मूल्यांशी नाळ कायमच जोडलेली असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे.