Join us

मेकअप रुममध्ये आरशासमोर उभ्या असलेल्या अभिनेत्याला ओळखलं का? नुकतीच बांधलीये लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 17:56 IST

Marathi actor: हा फोटो पाहिल्यावर अनेक जण तो नेमका कोण आहे याचे तर्कवितर्क लावतांना दिसत आहे. तुम्ही ओळखलं का या अभिनेत्याला?

सोशल मीडियावर दररोज असंख्य फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात खासकरुन सेलिब्रिटींच्या पोस्टचा सर्वाधिक समावेश असतो. सध्या अशाच एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याचा पाठमोरा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. त्याचा हा फोटो पाहिल्यावर अनेक जण तो नेमका कोण आहे याचे तर्कवितर्क लावतांना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्याचा पाठमोरा फोटो व्हायरल होत आहे. मेकअप रुममधील आरशासमोर तो उभा असल्याचं या फोटोमध्ये दिसून येत आहे. त्याचा हा फोटो पाहिल्यावर अनेक जण तो नेमका कोण असावा याचा विचार करायला सुरुवात केली. इतकंच नाही तर अनेकांनी वेगवेगळ्या अभिनेत्यांची नावदेखील सांगितली. मात्र, फोटोमध्ये दिसणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रथमेश परब आहे.

प्रथमेश सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे तो कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असतो. यामध्ये त्याने त्याचा पाठमोरा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्रथमेशने त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर हिच्यासोबत मोठ्या थाटात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची मराठी कलाविश्वात बरीच चर्चा रंगली होती. प्रथमेशने अल्पावधीमध्ये मराठी कलाविश्वात त्याच हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. टाइमपास, बीपी, टकाटक, डिलिव्हरी बॉय, डार्लिंग, 35% काठावर पास, बालक-पालक, उर्फी अशा कितीतरी सिनेमात त्याने काम केलं आहे.

टॅग्स :प्रथमेश परबसेलिब्रिटीसिनेमा