मराठी कलाविश्वात आजवर असे अनेक कलाकार पाहायला मिळतात जे खऱ्या आयुष्यात एकमेकांचे सख्खे भावंड आहेत. मृण्मयी देशपांडे- गौतमी देशपांडे, अभिषेक देशमुख- अमृता देशमुख अशा कितीतरी बहीण-भावांच्या जोड्या कलाविश्वात सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर दोन दिग्गज अभिनेत्रींच्या बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे. या दोन्ही अभिनेत्री आज मराठी कलाविश्वात भक्कमपणे पाय रोवून उभ्या आहेत.
सध्याच्या काळात सोशल मीडिया अत्यंत प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे अनेक कलाकार त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्यातील काही किस्से, घटनाही शेअर करत असतात. यात बऱ्याचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या कॉलेज जीवनातील वा बालपणीचे फोटो शेअर करुन जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. यात एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये पाहिल्यानंतर या प्रसिद्ध अभिनेत्रींना ओळखणंदेखील कठीण आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दिसणाऱ्या या दोन चिमुकल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून अभिनेत्री भार्गवी चिरमुले (bhargavi chirmule ) आणि चैत्राली गुप्ते (chaitrali gupte) आहेत. हा फोटो चैत्रालीने भार्गवीच्या वाढदिवशी शेअर केला होता. तसंच या फोटोला छानसं कॅप्शनही दिलं होतं. या फोटो आणि कॅप्शनमधून दोन्ही बहिणींमधील प्रेम दिसून येतं.
दरम्यान, भार्गवी आणि चैत्राली या दोघींनी अभिनयाच्या जोरावर मराठी कलाविश्वात त्यांचं स्थान निर्माण केलं आहे. चैत्रालीने अभिनेता, दिग्दर्शक लोकेश गुप्ते याच्यासोबत लग्न केलं असून त्यांना एक मुलगीदेखील आहे.