Join us

'अश्विनी ये ना...' गाण्यात अशोक सराफ यांच्यासोबत झळकलेली ही अभिनेत्री आठवतेय ना..?, आता ती दिसते अशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 07:00 IST

१९८७ साली 'गंमत जंमत' हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील अश्विनी ये ना हे गाणे खूप गाजले होते.

१९८७ साली गंमत जंमत हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकरने केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात सचिन पिळगावकर, अशोक सराफ, वर्षा उसगावकर, चारूशीला साबळे, सतीश शाह, सुधीर जोशी, श्रीकांत मोघे, आशालता आणि विजू खोटे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटातील अश्विनी ये ना हे गाणे खूप गाजले होते. हे गाणे अशोक सराफ आणि चारूशीला साबळे यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. चारूशीला साबळे सध्या सिनेइंडस्ट्रीमधून गायब आहेत.

अभिनेत्री चारूशीला साबळे शाहिर साबळे यांची कन्या आहे. त्या एक अभिनेत्री सोबत उत्तम नृत्यांगणा आहेत. चारूशीला साबळे यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे.

चारूशीला साबळे यांनी १९८२ साली त्यांच्या करिअरची सुरूवात केली. त्यांनी गंमत जंमत चित्रपटाशिवाय मी सिंधुताई सपकाळ, गाव तसं चांगलं, यमाच्या गावाला जाऊ या, ऑक्सिजन या चित्रपटात झळकल्या आहेत.

तसेच त्यांनी अंजाने रिश्ते, कयामत से कयामत तक या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय त्यांनी हिंदी मालिकेतही काम केले आहे.

चारूशीला साबळे यांनी अभिनेता अजित वच्छानी यांच्यासोबत लग्न केले. अजित वच्छानी यांचे २५ ऑगस्ट, २००३ साली निधन झाले.

चारूशीला आणि अजित यांना दोन मुली आहे. त्यांचे नाव आहे योहाना आणि त्रिशला. त्रिशला एअर हॉस्टेस आहे तर योहाना हीदेखील अभिनेत्री आहे. 

टॅग्स :अशोक सराफसचिन पिळगांवकर