नवरी मिळे नवऱ्याला (Navari Mile Navryala) हा सुपरहिट चित्रपट १९८४ साली रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांनी केले होते. सुप्रिया सबनीस आणि निवेदिता जोशी या दोघींचा हा पदार्पणातील पहिलाच चित्रपट ठरला होता. सचिन, सुप्रिया, संजय जोग, निवेदिता जोशी, अशोक सराफ, निलिमा परांडेकर, जयराम कुलकर्णी, श्रीकांत मोघे, दया डोंगरे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी स्वरबद्ध केलेलं निशाणा तुला दिसला ना या गाण्यात अशोक सराफ आणि निलिमा परांडेकर (Neelima Parandekar) झळकले होते.
नवरी मिळे नवऱ्याला हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ३८ वर्षे लोटली आहेत. या काळात निलिमा परांडेकर मराठी सिनेइंडस्ट्रीत फारशा दिसल्या नाहीत. मात्र त्या हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे.
निलिमा परांडेकर यांनी १९८४ सालच्या माहेरची माणसे या चित्रपटातही काम केले होते. मराठी चित्रपटात कमी काम केलेल्या निलिमा परांडेकर यांनी नंतर हिंदीच्या छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख बनवली. शॉर्टकट रोमिओ, एक घर बनाउंगा, बिट्टी बीजनेसवाली, ढुंढ लेगी मंजिल हमें अशा हिंदी मालिकेतून त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.
एक घर बनाउंगा या मालिकेत त्यांनी साकारलेली मंगलादेवी शशिकांत गर्गची भूमिका खूपच हिट ठरली होती. चरित्र अभिनेत्री तसेच सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका मिळत गेल्याने निलिमा यांनी हिंदी मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.