Join us

संजय दत्तच्या 'वास्तव' सिनेमामधील दीडफुट्या आठवतोय का?, अभिनेत्याची पत्नी दिसायला आहे खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 07:00 IST

Sanjay Narvekar: संजय दत्तच्या वास्तव सिनेमामधील दीडफुट्या आठवला ना. ही भूमिका मराठी अभिनेता संजय नार्वेकर यांनी केली होती. वास्तव चित्रपटातील या भूमिकेला समीक्षक आणि प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती.

संजय दत्त (Sanjay Dutt)च्या वास्तव सिनेमामधील दीडफुट्या आठवला ना. ही भूमिका मराठी अभिनेता संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी केली होती. वास्तव चित्रपटातील या भूमिकेला समीक्षक आणि प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. त्यानंतर त्यांनी हंगामा सारख्या सुपरहिट हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. तसे पाहायला गेले तर बऱ्याच हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेमध्ये संजय नार्वेकर झळकले आहेत.

खारी बिस्कीट, ये रे ये रे पैसा, लाडीगोडी, वेल डन भाल्या, फक्त सातवी पास, हरहर महादेव, बाबूरावला पकडा, बे दुणे साडेचार, नशिबाची ऐशीतैशी, लोणावळा बायपास अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये संजय नार्वेकर यांनी प्रमुख भूमिका निभावली होती. याशिवाय त्यांनी नाटकातही काम केले आहे.

संजय नार्वेकर त्यांच्या यशामागे त्यांच्या पत्नीचा हात आहे असे अभिमानाने सांगतात.  संजय नार्वेकर यांच्या पत्नीचे नाव असिता आहे. त्या एक सुशिक्षित गृहिणी आहेत. संजय व असिता एका कॉलेजमध्ये शिकत असताना संजय यांना त्या आवडू लागल्या. त्यानंतर त्यांनी असिता यांना प्रपोझ केले त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी देखील होकार दिला. त्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्न केल्यानंतर ते मुंबईत वास्तव्यास आले. त्यानंतर संजय याच्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. असिता यांच्या पाठिंब्यामुळेच संजय नार्वेकर कलाविश्वात यशस्वी झाले. असिता या लाइमलाइट आणि सोशल मीडियापासून दूर आहेत. संजय नार्वेकर आणि असिता यांच्या लग्नाला २८ वर्षे झाले असून त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव आर्यन आहे. 

टॅग्स :संजय नार्वेकरसंजय दत्त