आयत्या घरात घरोबा चित्रपट १९९१ साली रिलीज झाला होता. या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, किशोरी शहाणे तसेच राजेश्वरी सचदेव यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात काननची भूमिका अभिनेत्री राजेश्वरी सचदेवने केली होती. फार कमी लोकांना माहित आहे की, राजेश्वरी सचदेवचा नवरा देखील अभिनेता आहे.
आयत्या घरात घरोबा चित्रपटात अभिनेत्री राजेश्वरी सचदेव हिने कानन म्हणजेच सचिन पिळगावकर यांची बहिणीची भूमिका साकारली होती. जी नंतर लक्ष्मिकांत बेर्डेच्या प्रेमात पडते.
अभिनेत्री राजेश्वरी सचदेव ही थिएटर आर्टिस्ट, गायिका तसेच नृत्यांगना आहे. आयत्या घरात घरोबा हा तिने केलेला पहिला वहिला मराठी चित्रपट. या चित्रपटानंतर श्याम बेनेगल यांनी ‘सुरज का सांतवा घोडा’ चित्रपटात तिला काम दिले.
सरदारी बेगम, हरी भरी, द फरगॉटन हिरो, वेलकम तू सज्जनपूर अशा बॉलिवूड चित्रपटातून ती झळकली. ती एक उत्तम सूत्रसंचालिका देखील आहे. अनेक हिंदी कार्यक्रमांत तिने संचालन केले आहे.
फार कमी लोकांना माहित आहे की राजेश्वरी सचदेव हिने अभिनेता वरुण वडोलासोबत लग्न केले. वरुण वडोला हा हिंदी मालिका अभिनेता म्हणून ओळखला जातो.
ये है मुंबई मेरी जान , कोशीश एक आशा, सोनी महिवाल, अस्तित्व एक प्रेम कहाणी अशा अनेक दर्जेदार मालिकेतून कधी विनोदी भूमिका तर कधी गंभीर भूमिका त्याने साकारल्या आहेत.