२०११ साली रिलीज झालेला शाळा हा चित्रपट तुम्हाला आठवतोय ना. या चित्रपटात शाळेतल्या वयात मुलांमधील प्रेमामधील आकर्षण दाखवण्यात आले आहे. लहान वयातील प्रेमातील आकर्षण हा विषय त्याकाळी मराठी चित्रपटसृष्टीत वापरण्यात आला होता. चित्रपटांत जोश्या आणि शिरोडकर यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे.
मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजय डहाकेने केले होते. हा चित्रपट त्यावेळी खूपच हिट ठरला होता. या चित्रपटात शिरोडकरची भूमिका साकारणारी बालकलाकार केतकी माटेगावकर खूपच लोकप्रिय झाली. आता केतकी खूप मोठी झाली असून आता ती खूपच ग्लॅमरस दिसते.
सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे ती बऱ्याचदा चर्चेत येत असते. गेल्या काही वर्षांत केतकीमध्ये खूप बदल झालेला पहायला मिळतो. तिचा हा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना खूप भावतो.
या चित्रपटातील दगडू आणि प्राजूची लव्हस्टोरी चाहत्यांना खूपच भावली. आजही ती प्राजू म्हणून प्रचलित आहे. केतकी अभिनेत्रीसोबतच उत्तम गायिकादेखील आहे.
तिने जरासा तू, वारा पहाटवारा, तुम मिल जाओ ही गाणीदेखील गायली आहेत. याशिवाय तिने अनेक चित्रपटातील गाण्यांनाही स्वरसाज दिला आहे.