अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) सैराट (Sairat) सिनेमातून एका रात्रीत लोकप्रिय झाला. पहिल्याच चित्रपटात परशाची भूमिका साकारुन त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले. या चित्रपटानंतर त्याच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. आता तो लवकरच 'घर बंदुक बिरयाणी' (Ghar Banduk Biryani) या सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटातही तो एका हटके भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात आकाश ठोसर आणि सायली पाटील (Sayali Patil) या फ्रेश जोडीचा रोमँटिक अंदाज बघायला मिळणार आहे.
आकाश ठोसर आणि सायली पाटीलने नुकतेच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी सायलीला प्रश्न विचारण्यात आला की आकाश फ्लर्ट करतो का? त्यावर सायलीने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली की, त्याच्याबद्दलची एक तक्रार आहे. माझी खरेतर आम्ही अपघाताने मित्र झालो आहोत. झुंड चित्रपटाच्यावेळी मी त्याच्या गाडीचा अपघात केला होता तरीदेखील तो खूप शांत होता.
त्यानंतर सायलीला विचारण्यात आले की तू आकाशबरोबर फ्लर्ट करतेस का?” त्यावर तिने नाही असे उत्तर दिले. नागराज मंजुळे हे लवकरच ‘घर, बंदूक, बिरयानी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. येत्या ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.