Join us

दीपाली सय्यदने अनोख्या अंदाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केलं विनम्र अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 4:35 PM

दीपाली सय्यदने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दीपाली अरे भावा आमचा जय भीम घ्यावा या गाण्यावर थिरकताना दिसते आहे

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दीपाली सय्यद सोशल मीडियावर सक्रीय आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतीच तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तिने अनोख्या अंदाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले आहे. 

दीपाली सय्यदने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दीपाली अरे भावा आमचा जय भीम घ्यावा या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. अरे भावा आमचा जय भीम घ्यावा. दीपाली सय्यदच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यदने बऱ्याच हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम केले आहे. अभिनयाशिवाय तिने राजकारणातही प्रवेश केला आहे. दिपाली सय्यदचा सिनेइंडस्ट्रीतील प्रवास मालिकेतून सुरू झाला. बंदिनी, समांतर या तिच्या कारकीर्दीच्या सुरूवातीच्या मालिका आहेत. त्यानंतर अनेक मालिका, चित्रपट, नाटक व शोज, जाहिरातीमधून ती झळकली. दिपाली जाऊ तिथे खाऊ, चश्मेबहाद्दूर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या चित्रपटातील भूमिकांसाठी ओळखल्या जाते. मात्र खऱ्या अर्थाने ओळख जत्रा सिनेमातील ये गो ये मैना या गाण्यातून तिला मिळाली. करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टू जंगल, उचला रे उचला व मुंबईचा डब्बेवाला या चित्रपटात त्यांनी काम केले.

 

टॅग्स :दीपाली सय्यदडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती