डॉ. मोहन आगाशे यांना आणखीन एक पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 07:24 AM2017-12-18T07:24:06+5:302017-12-18T12:54:06+5:30

उत्तम संवेदनशील कलाकाराची निर्मिती नेहमी थिएटर मधूनच होते. हा कलाकार नेहमीच आपली छाप आपल्या नाट्य कलाकृतीद्वारे सोडतो. भारतात थेस्पो ...

Dr. Mohan Agashe released another award | डॉ. मोहन आगाशे यांना आणखीन एक पुरस्कार जाहीर

डॉ. मोहन आगाशे यांना आणखीन एक पुरस्कार जाहीर

googlenewsNext
्तम संवेदनशील कलाकाराची निर्मिती नेहमी थिएटर मधूनच होते. हा कलाकार नेहमीच आपली छाप आपल्या नाट्य कलाकृतीद्वारे सोडतो. भारतात थेस्पो हा एक दिवसीय कार्यक्रम म्हणून सुरु झाला होता, पण आता हा कार्यक्रम नावाजलेला आठ दिवसीय युथ थिएटर फेस्टिव्हल म्हणून ओळखला जातो. थेस्पोत इस्लामपूर, सांगली व लखनऊ अश्या छोट्या शहरांतून सुद्धा काही ग्रुप निवडून आले आहेत. २५ वर्षाखालील सर्व तरुणांना अश्या चांगल्या व्यासपीठाची संधी उपलब्ध करून दिली जाते. थेस्पो हे भारतात सीमित राहिला नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील कामगिरी बजावत आहेत. अमेरिका, ग्रीस, यूके आणि ब्राझील यांसोबतच शेजारील देश श्रीलंका आणि पाकिस्तान गेल्या तीन वर्षांपासून सहभागी होत आहेत.

हा युथ थिएटर फेस्टिवल दिनांक १८ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०१७ या दरम्यान प्रिथ्वी थिएटर जुहू येथे होणार असून यात फुल लेन्थ प्ले, फ्रिंज परफोर्मंस, प्लँटफोर्म परफोर्मंस आणि लाईव्ह म्युझिक असणार आहे. या सोबतच विविध कार्यशाळा, रंगमंच खेळ, वाचन आणि वस्तू संग्रहालय असे सगळे उपक्रम देखील होणार आहेत.

संपूर्ण भारतभर घेतलेल्या ऑडिशन मधून फुल लेन्थ प्ले या नाटक विभाग साठी ४ नाटकाची निवड करण्यात आली आहे. यात दिल्लीचे वैरंगी म्रिग-त्रिष्णा हे नाटक दिनांक १९ डिसेंबर  आणि २० डिसेंबर २०१७ रोजी रात्री ९ वाजता सादर होणार आहे. थेस्पो मध्ये प्रथमच लखनऊच्या टीमने ऑडिशन दिले होते आणि करूज थिएटर ग्रुप चे मै मेरा बाज और वो या नाटकाची निवड झाली आहे 

अमेरिका, ग्रीस, यूके आणि ब्राझील यासोबतच शेजारील देश श्रीलंका आणि पाकिस्तान यात सहभागी होतात.जेस थोर्पे, मॅथ्यू वासेर, कार्ल अल्फान्सो, रेनाटो रॉचा, ताशी घोरे, अर्घ्य लाहिरी, अलेक्झांड्रस राप्तीस, सीसी इग्नाटिडॉ आणि अलेक पदमसी यांसारखे प्रख्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलावंत या सात दिवसीय थेस्पो कार्यक्रमात सहभाग असणार आहे व मँजिक आउर, ऑफ द स्क्रीन, बॅकस्टेज निन्जास, किनोमो-मूविंग, बिकामिंग समवन, आयलंड ऑफ फिलिंगस असे विविध प्रकारचे थिएटर वर्कशॉप आणि त्याच बरोबर खास लहान मुलांसाठी “हिप्पो थियटर” यात सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलावंत नाटक आणि थिएटर बद्दल अधिक ज्ञान व प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित असतील.

कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दिनांक २४ डिसेंबर २०१७ रोजी सर्व विजेत्यांची नवे घोषित केले जातील व थिएटर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी आणि योगदानासाठी थेस्पो १९ चा जीवनगौरव पुरस्कार या वर्षी श्री. डॉ. मोहन आगाशे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
 

Web Title: Dr. Mohan Agashe released another award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.