Join us

नाटक करणे जास्त आव्हानात्मक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2016 6:30 PM

 बेनझीर जमादार  वायझेड या चित्रपटातून अभिनेता सागर देशमुख प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तसेच तो अनेक नाटकमधूनदेखील आपला अभिनय प्रेक्षकांपर्यत ...

 बेनझीर जमादार  वायझेड या चित्रपटातून अभिनेता सागर देशमुख प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तसेच तो अनेक नाटकमधूनदेखील आपला अभिनय प्रेक्षकांपर्यत पोहोचवत असतो. आपल्या अभिनयाप्रमाणेच तो लिखाणाचीदेखील जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडताना दिसत आहे. नुकतेच त्याने शिल्लक हे नाटक लिहिले आहे. त्याच्या या नाटकाविषयी त्याच्याशी साधलेला हा मनमोकळा संवाद.१. शिल्लक या नाटकाविषयी काही सांगशील?- एक राइटस ब्लॉक नावाचा उपक्रम आहे. या उपक्रमअंतर्गत शिल्लक हे नाटक लिहीले आहे. भारतातील अडचणी हा या नाटकाचा विषय होता. त्यासाठी माझी निवडदेखील झाली. तसेच माझ्या मनातदेखील हे नाटक फार दिवस रेंगाळत होते. मात्र शेवटी योगायोगाने या उपक्रमाच्या निमित्ताने ही परिस्थिती जुळून आली. २. या नाटकाविषयी थोडक्यात काय सांगशील?- या नाटकामध्ये एक भारतीय फॅमिली दाखविण्यात आली आहे. या फॅमिलीतील कर्ता माणूस म्हणजेच वडिलांना अचानक नोटीस देण्यात येते की, उदयापासून कामाला यायचे नाही. त्यावेळी त्या माणसाची व त्याच्या परिवाराचे काय होते ही परिस्थिती मांडणारे हे नाटक आहे.३. तू अनेक नाटकामध्ये अभिनय केला आहे त्यामुळे नाटक लिहीणे व अभिनय करणे यात काय फरक जाणविला?- खर तर प्रामुख्याने मी एक अभिनेता आहे. नाटक ज्यावेळी लिहीतो त्यावेळी त्या लेखकाची दृष्टी ही खूपच निराळी असते हे कळाले. त्याचप्रमाणे एखादया कलाकाराला आपल्या अनुभवाने अभिनय करताना नाटकामध्ये काही गंमतीजमती करता येते. मात्र नाटक लिहीताना लेखक त्याचा अनुभव कळकळीने मांडत असतो. मात्र जे लेखकाला वाटते ते प्रेक्षकांना कशावरून वाटणार यासाठी  लेखकाला नाटकाचे स्वरूप लिहीताना खरा हेतू सांभाळावा लागतो. ४. तू नाटक आणि चित्रपटदेखील केले आहेत, मात्र तुझ्यासाठी जास्त आव्हानात्मक काय वाटले?- मी ज्यावेळी रंगभूमीवर उभा असतो त्याचवेळी मी जास्त कन्फर्टेबल असतो. त्यामुळे नाटक करताना मला जास्त मजा येते. तसेच टेलिव्हिजन आणि चित्रपटाचे कॅमेराचे तंत्रज्ञान अदयापदेखील समजले नाहीत.  नाटकात जास्त काम केल्यामुळे मला या क्षेत्राचा जास्त अनुभव असला तरी हेच क्षेत्र माझ्यासाठी जास्त आव्हानात्मक आहे असे मला वाटते. ५. तू अनेक नाटक हे प्रांतिक भाषेमध्ये केले आहेत त्यामुळे प्रेक्षकवर्गचा अनुभव काय?- माझी मातृभाषा मराठी असल्यामुळे या भाषेमध्ये काम करणे अधिक कर्न्फेटेबल वाटते. मात्र ज्यावेळी भाषा बदलते त्यावेळी त्याचा प्रेक्षकवर्गदेखील बदलत असतो. मी एक हिंदी नाटक केले होते. हिंदी म्हटले की, हे नाटक आम्ही फक्त महाराष्ट्रातच न करता इतर राज्यातदेखील सादर केले होते. त्यामुळे प्रत्येक प्ऱयोगाला वेगवेगळा प्रेक्षकवर्ग मिळत गेला. त्यामुळे अशा वेगवेगळया प्रेक्षकांसमोर कला सादर करणे हे एक प्रत्येक कलाकारासाठी खूपच आव्हानात्मक असते. ६. वायझेड या चित्रपटानंतर तुझ्या काही नवीन प्रोजक्टविषयी काय सांगशील?- मी सध्या मैं हू युसुफ और ये है मेरा भाई या हिंदी नाटकामध्ये व्यग्र आहे. तसेच काही प्रोजेक्टची बोलणीदेखील चालू आहे. खरं तर मला ही छोटया पडदयावर झळकण्याचा मानस आहे. फक्त एका चांगल्या विषयाची वाट पाहत आहे. चांगली स्क्रीप्ट मिळाली तर नक्कीच मालिका व चित्रपट करण्याची करण्याची तयारी आहे. पाहूयता माझी व प्रेक्षकांची ही इच्छा कधी पूर्ण होते.