सेलिब्रिटी मंडळी कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह संवाद साधतात. सोशल मीडियावर आपल्या सिनेमांच्या प्रमोशनपासून ते स्वतःच्या जीवनातील गोष्टींची माहिती सेलिब्रिटी सोशल मीडियावर शेअर करत असतात.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी आपल्या जीवनातील काही सुखद आणि खास क्षणसुद्धा रसिकांसह शेअर करतात. मराठमोळा अभिनेता आकाश ठोसरसुद्धा सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. आकाशनं नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
'१९६२ : द वॉर इन द हिल' रिलीज झाली. त्या वेब सीरिजच्या डबिंगचा एक व्हिडीओ आकाशनं इन्स्टाग्रामवर नुकताच शेअर केला आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. दिसायला हे काम जितके सोप्पं दिसते तितके ते नाही. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना याची खात्री नक्कीच पटली असणार.मोठ्या मेहनतीने आकाश समोर दिसत असलेल्या सीन नुसार आवाज देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पिळदार शरियष्टी बनवण्यासाठी जितकी मेहनत आकाशने घेतलीय तितकीच मेहनत डब्बींगसाठी तो करत असल्याचं पाहायला मिळतंय.
२०१६मध्ये आलेल्या 'सैराट' चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्याचा पहिलाच चित्रपट तुफान गाजला. त्यानं साकारलेल्या परश्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. त्यानंतर त्यानं काही बॉलिवूड चित्रपटात आणि हिंदी वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. त्याच्या वर्कफ्रंट बद्दलायचं तर तो लवकरच तो नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'झूंड'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात त्याच्यासोबत आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू सुद्धा दिसणार आहे.