Join us

सलमानच्या 'सिकंदर'मुळे थिएटरमधून काढले 'हार्दिक शुभेच्छा' सिनेमाचे शो, मराठी अभिनेता भडकला, म्हणाला...

By कोमल खांबे | Updated: April 1, 2025 10:49 IST

सलमानच्या सिनेमामुळे 'हार्दिक शुभेच्छा' सिनेमाचे शो थिएटरमधून काढण्यात आले आहेत. अभिनेता पुष्कर जोगने याबाबत स्टोरी शेअर करत संताप व्यक्त केला आहे. 

सलमान खानने ईदच्या मुहुर्तावर 'सिकंदर' सिनेमा प्रदर्शित करत चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच या सिनेमाच्या पहिल्या दिवसाचे शो हाऊसफूल झाले होते. आताही चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. एकीकडे सलमानचा 'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर सुसाट पळत असताना दुसरीकडे मात्र याचा फटका 'हार्दिक शुभेच्छा' या मराठी सिनेमाला बसला आहे. सलमानच्या सिनेमामुळे 'हार्दिक शुभेच्छा' सिनेमाचे शो थिएटरमधून काढण्यात आले आहेत. अभिनेता पुष्कर जोगने याबाबत स्टोरी शेअर करत संताप व्यक्त केला आहे. 

पुष्कर जोगचा 'हार्दिक शुभेच्छा' सिनेमा २१ मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. मात्र सलमानच्या 'सिकंदर'मुळे या सिनेमाला शो मिळत नसल्याचं अभिनेत्याचं म्हणणं आहे. याबाबत त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. यामधून त्याने संताप व्यक्त केला आहे. "सिकंदरसारखे चित्रपट आले की आमची दुसऱ्या आठवड्यात चालणारी फिल्म काढायची...छान...खरं तर मी गुंडा असतो तर बरं झालं असतं. निदान राग तरी काढता आला असता. ह्यासाठी कोणी काहीच करत नाही याचा अभिमान वाटतो", असं पुष्करने म्हटलं आहे. 

दरम्यान, 'हार्दिक शुभेच्छा' या सिनेमात पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, पृथ्वीक प्रताप अशी स्टारकास्ट आहे. या सिनेमाचं दिग्दर्शनही पुष्करने केलं आहे. तर सलमानच्या 'सिकंदर'मध्ये रश्मिका मंदानादेखील आहे. या सिनेमाने दोनच दिवसांत ५५ कोटींचा गल्ला जमवला आहे. 

टॅग्स :सलमान खानपुष्कर जोगसिनेमा