Join us

LokDown दरम्यान अमोल कोल्हे म्हणतोय,बोला अलख निरंजन !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 4:45 PM

नागेश भोसले, दीपक शिर्के, दिपाली सैय्यद, मिलिंद दास्ताने यांच्या विशेष भूमिका झी टॉकीज च्या प्रेक्षकांना "बोला अलख निरंजन" या चित्रपटामार्फत बघायला मिळणार आहेत.

करोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. लॉकडाउनमुळे देशभरातील लोक आता आपल्या घरातच कैद झाले आहेत. रसिकांच्या मनोरंजनासाठी जुन्या मालिकांप्रमाणे आता सुपरहिट ठरलेलेल सिनेमेदेखील टीव्हीवर सुरू करण्यात आले आहेत.  अमोल कोल्हेचा "बोला अलख निरंजन"  चित्रपट रसिकांसाठी घरबसल्या मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे. महाराष्ट्राचे लाडका अभिनेता डॉ .अमोल कोल्हेची लक्षवेधी आणि एक वेगळी भूमिका त्यांच्या चाहत्यांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे. 

विशेष म्हणजे मालिकेत व्ही एफ क्स टेक्नॉलॉजीचा अफलातून प्रयोग हे या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य आहे.   आपल्या दर्जेदार अभिनयाने   घराघरात पोहोचलेल्या डॉ अमोल कोल्हे आणि अभिनेत्री सिया पाटील  यांच्या अभिनयाचा एक वेगळा पैलू यानिमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तर नागेश भोसले, दीपक शिर्के, दिपाली सैय्यद, मिलिंद दास्ताने यांच्या विशेष भूमिका झी टॉकीज च्या प्रेक्षकांना "बोला अलख निरंजन" या चित्रपटामार्फत बघायला मिळणार आहेत. चित्रपटात अमोल कोल्हे  नास्तिक असल्याचे दाखविण्यात आले आहे, तर सिया पाटील (अदिती ) हिची देवावर प्रचंड श्रद्धा आहे. नवनाथांच्या महतीचे यथार्थ दर्शन करणारा घन:श्याम येडे दिग्दर्शित ‘बोला अलखनिरंजन’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाचे संगीत विशाल बोरूळकर तर सुरेश वाडकर, रविंद्र साठे, नेहा राजपाल, बेला शेंडे यांनी भक्तीमय गिते गायली आहेत.

या चित्रपटाचा संदर्भ नवनाथ भक्तिसार या धार्मिक पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. नवनाथांन पैकी एक असलेल्या मच्छिंद्र नाथ यांच्या जीवनावर आधारित पहिल्यांदाच असा भव्यदिव्य चित्रपट येत आहे. हा चित्रपट फक्त पौराणिक नसून सद्यस्थिती चीही जोड त्याला देण्यात आली आहे. त्यामुळे तुंबाड या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर "बोला अलख निरंजन" हा  चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल याची खात्री वाटते.