प्रत्येकाने स्वतःवर सेल्फ सेन्सॉरशिप लादली पाहिजे ः निपुण धर्माधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 11:57 AM
कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण या वेबसिरिजमुळे नावारूपाला आलेल्या निपुण धर्माधिकारीने नुकतेच बापजन्म या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ...
कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण या वेबसिरिजमुळे नावारूपाला आलेल्या निपुण धर्माधिकारीने नुकतेच बापजन्म या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याच्या या नव्या इनिंगबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...तू वेब सिरिज या माध्यमात खूप प्रसिद्ध आहे. चित्रपटांकडे वळताना काही दडपण होते का?बापजन्म हा तसा माझा दुसरा चित्रपट आहे. याआधी मी एक चित्रपट दिग्दर्शित केला आहे. पण तो अद्याप प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे बापजन्मच्या वेळी तर मला काहीच टेन्शन नव्हते. माझ्या प्रोडक्शन टीममधील अनेक जण तर माझे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यामुळे आमच्या सगळ्यांमध्ये खूप छान ट्युनिंग आहे. मी चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण केल्यानंतर सचिन सर यांच्यासोबत चित्रीकरण करायला सुरुवात केली. तोपर्यंत मी देखील या चित्रपटाच्या चित्रीकरणात रूळलो होतो. त्यामुळे एका दिग्गज कलकारासोबत काम करताना टेन्शन आले नाही आणि त्यांनीदेखील आम्हाला खूप चांगल्याप्रकारे समजून घेतले. बापजन्म या चित्रपटाच्या स्टार कास्टची निवड कशी केलीस?काही भूमिका लिहितानाच एखादा कलाकार तुमच्या डोळ्यासमोर उभा राहातो. त्यामुळे या चित्रपटातील भास्कर पंडित ही भूमिका सचिन खेडेकर यांनीच साकारावी असे मला सुरुवातीपासून वाटत होते. त्यांना मी या चित्रपटाची कथा ऐकवली आणि त्यांना देखील ती आवडली आणि ते या चित्रपटाचा भाग बनले. त्यानंतर इतर कलाकार नवीन असावेत असे माझे आणि सचिन सर यांचे म्हणणे होते. पुष्कराज चिरपूटकर माझा अनेक वर्षांपासूनचा मित्र आहे. माऊली ही भूमिका तो चांगल्याप्रकारे साकारू शकेल असे मला वाटत होते. पण करियरच्या या टप्प्यावर तो नोकराची भूमिका साकारेल का असा मला प्रश्न पडला होता. पण त्याने कथा वाचताच होकार दिला. तसेच pushkaraj chirputkarशर्वरी लोहोकरे ला तर कथा लिहित असतानाच या चित्रपटाविषयी मी सांगितले होते. तुझा चित्रपट आहे तर मी त्याच्यात नक्कीच काम करणार असे तिने मला तेव्हाच सांगितले होते. केवळ या चित्रपटात सचिन सरांच्या मुलाची म्हणजेच विक्रमची भूमिका कोण अभिनेता साकारणार याच्या आम्ही शोधात होतो. सत्यजीत पटवर्धन माझ्या प्रोडक्शन टीममध्ये होता. तो विक्रम या भूमिकेसाठी योग्य असल्याचे मला वाटल्याने या भूमिकेसाठी मी त्याची निवड केली.वेबसिरिज या माध्यमाबद्दल लोकांच्या मनात अतिशय चुकीच्या भावना आहेत असे तुला वाटते का?वेबसिरिज या माध्यमावर कोणाचाही कंट्रोल नसल्याने वेबसिरिजमध्ये उगाचच शिव्या घालताना दाखवण्यात येतात असे सगळ्यांना वाटते. पण माझ्यामते प्रत्येकाने स्वतःवर सेल्फ सेन्सॉरशिप लादली पाहिजे. आपण उगाचच काहीही लोकांना दाखवायचे नाही हे प्रत्येकाने ठरवण्याची गरज आहे. पाश्चिमात्य मालिकांचा सध्याच्या मालिका, चित्रपटांवर प्रभाव आहे का?आजकाल प्रेक्षकांना घरबसल्या बाहेर देशातील मालिका, चित्रपट पाहायला मिळतात. आपल्यापेक्षा पाश्चिमात्य देशात टिव्हीला अधिक महत्त्व आहे. आजचे सगळेच दिग्दर्शक, निर्माते पाश्चिमात्य कार्यक्रम पाहातात. पण भारतात कार्यक्रम बनवताना त्यांनी भारतीय प्रेक्षकांचा विचार करणे गरजेचे आहे. आजही आपला प्रेक्षक डेली सोपमध्ये अडकलेला आहे. नवीन पिढी जरी या टिव्हीपासून पळत असली तरी याचे प्रमाण खूप कमी आहे. माध्यम कोणतेही असो कथा ही सगळ्यात महत्त्वाची असते असे मला वाटते.Also Read : Baapjanma Movie Review