Join us

Exclusive अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि शुभंकर तावडे झळकणार '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 8:31 PM

या चित्रपटानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर ५० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी केली आहे.

कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अभिनेत्री संस्कृती बालगुडेकडे आहे. तिने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत. अनेक सिनेमे न स्वीकारता सिलेक्टिव्ह राहायला संस्कृतीला आवडते. लवकरच संंस्कृती  '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' या सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत शुभंकर तावडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या अनोख्या नावानेच चर्चेत असलेल्या '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी'  या चित्रपटानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर ५० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी केली आहे. एका वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते, विकास हांडे, लोकेश मांगडे हे ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचे निर्माते आहेत तर  सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे .'८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' या चित्रपटात नावापासूनच वेगळेपण आहे. गेल्यावर्षी या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आल्यानंतर चित्रपटाविषयी कुतुहल निर्माण झालं होतं. आतापर्यंत वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटानं ५०हून अधिक पुरस्कार मिळवण्याची कामगिरी केली आहे. 

आजवर फ्रान्स , सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्स सह भारतात, पोंडेचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील फेस्टिव्हल्स मध्ये ह्या चित्रपटास पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.  हा देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा, असा चित्रपटाचा विषय आहे. बहुधा ह्या विषयावर झालेला कोणत्याही भाषेतला हा पहिला सिनेमा आहे. आता ""८ दोन ७५ फक्त इच्छाशक्ती हवी !" असं नाव आणि देहदान हा विषय ह्याचा संबंध काय हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. 

चित्रपटाची पटकथा शर्वाणी - सुश्रुत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन केले आहे. उत्तम कलाकार, उत्तम विषय ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. 

टॅग्स :संस्कृती बालगुडे