Join us

Exclusive : करण जोहर बनवणार 'झिम्मा'चा हिंदी रिमेक, हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला - "खरंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 2:54 PM

Hemant Dhome on Jhimma Hindi Remake : काही दिवसांपूर्वी झिम्मा चित्रपटाचा करण जोहर हिंदी रिमेक बनवणार असून स्टारकास्टही निश्चित झाल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान आता या वृत्तावर दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोगने लोकमत फिल्मीमध्ये खुलासा केला आहे.

२०२१ साली 'झिम्मा' (Jhimma) चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा सीक्वल 'झिम्मा २' (Jhimma 2) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी झिम्मा चित्रपटाचा करण जोहर (Karan Johar) हिंदी रिमेक बनवणार असून स्टारकास्टही निश्चित झाल्याचे वृत्त समोर आले होते. या वृत्ताबाबत दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि निर्माती क्षिती जोग(Kshiti Jog)ने लोकमत फिल्मीमध्ये खुलासा केला आहे.

याबाबत हेमंत ढोमे म्हणाला की,''हे खरंय. यावर चर्चा सुरू आहेत. मी स्पष्टपणे नकार देणार नाही. क्षिती आणि करण जोहर सरांनी यांनी नुकतेच रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये एकत्र काम केले आहे. त्या काळात याबद्दल त्या दोघांमध्ये बरीच चर्चा झाली. त्यादरम्यान बाहेर असं पसरलं की झिम्माचा हिंदी रिमेक येणार आहे आणि त्यातील कलाकारांची निवडदेखील झाली आहे. मात्र कास्टिंगच्या वृत्तात अजिबात तथ्य नाही. ही निव्वळ अफवा आहे. पण याबद्दल आता मी जास्त काही सांगू शकत नाही.'' 

..तरी माझी काही हरकत नाहीहेमंतनंतर क्षिती जोग म्हणाली की, ''कास्टिंगबद्दल पसरलेली चर्चा खोटी आहे. एवढ्यात तरी काही नाही. येत्या वर्षात किंवा २०२४ मध्ये हा चित्रपट येईल, हे शक्य नाही. बायकांची गोष्ट असल्यामुळे यावर चित्रपट कोणत्याही भाषेत बनला तरी माझी काही हरकत नाही. ही कथा आणि पात्र तेवढ्याच प्रामाणिकरित्या मांडता आली तर मला चित्रपटाची कलाकार आणि निर्माती म्हणून खूप आनंद होईल. ही गोष्ट अजून वेगळ्या भाषेतील वेगळ्या बायकांनी जरुर पाहावी. ''

'झिम्मा २'बद्दलकलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित 'झिम्मा २'ची सफर २४ नोव्हेंबरला घडणार आहे.  इंदूच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने परदेशात रियुनियनसाठी निघालेल्या या सात मैत्रिणींचा प्रवास आता थोडा रंजक, थोडा भावनिक आणि थोडा हटके असणार आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :करण जोहर