Exclusive : संजय दिसणार मुस्लीम भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2016 1:35 PM
प्रियांका लोंढेदिग्दर्शक संजय जाधव पहिल्यांदाच अभिनय करणार असल्याचे आम्ही तुम्हाला सांगितलेच होते. संजय आता कॅमेºयाच्या ...
प्रियांका लोंढेदिग्दर्शक संजय जाधव पहिल्यांदाच अभिनय करणार असल्याचे आम्ही तुम्हाला सांगितलेच होते. संजय आता कॅमेºयाच्या मागे नाही तर कॅमेºयासमोर आपले अभिनय कौशल्य कसे दाखवणार हे पाहणे खरच मनोरंजक ठरणार आहे. संजयने आत्तापर्यंत अनेक हिट सिनेमे चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्याच्या दुनियादारी या चित्रपटाने तर बॉक्स आॅफिसवर चांगलीच कमाई केली. त्या चित्रपटानंतरच आज संजय जाधव हे नाव घराघरात पोहचले आहे. परंतू आजपर्यंत संजय जाधव यांची दिग्दर्शक म्हणुन ओळख होती. आता एक अभिनेता म्हणुन देखील नवी ओळख करण्यास संजय सज्ज झाला आहे. लग्न मुबारक या चित्रपटामध्ये संजय जाधव एका महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार असल्याचे समजतेय. या चित्रपटात आपल्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, संस्कृती बालगुडे, आणि सिदधांत मुळे हे कलाकारल दिसतील. चित्रपटाच्या नावावरुनच यामध्ये काही मुस्लीम पात्र असणार हे समजतेय. संजय देखील पहिल्याच चित्रपटामध्ये एका दमदार मुस्लीम कॅरेक्टरमध्ये दिसणार आहे. चित्रपटातील भूमिकेनुसार संजयचा लुक देखील यामध्ये एकदम वेगळा असणार आहे. डोळ््यात काजळ घालुन संपूर्ण चित्रपटामध्ये संजयला अभिनय करायचा आहे. काजळ घालताना डोळे खुप दुखतात, माझ्या डोळ््यातून पाणी येते म्हणुन संजयने सुरुवातीला काजळ घालण्यास मनाई केली होती. परंतू मेकअपमॅनने अगदी सहजपणे संजयच्या डोळ््यात नकळतपणे काजळ घातले आणि संजयला ते आवडले देखील. आता अशाच वेगळ््या लुकमध्ये संजय या चित्रपटात दिसणार आहे. त्याची यामधील भूमिका नक्की काय आहे याचा उलगडा झालेला नाही. परंतू संजय प्रथमच अभिनय करणार आणि ते ही एक आव्हानात्मक पात्र पहिल्याच सिनेमात साकारणार यामुळे संजयचे चाहते त्याला मोठ्या पडदयावर पाहण्यास उत्सुक आहेत.