Exclusive सैराट गर्लचा मेकओवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2016 8:28 AM
प्रियांका लोंढे सैराट मधील आर्चीच्या अभिनयाने संपुर्ण महाराष्ट्रालाच झिंग ...
प्रियांका लोंढे सैराट मधील आर्चीच्या अभिनयाने संपुर्ण महाराष्ट्रालाच झिंग चढली आहे. या चित्रपटातील आपल्या अदाकारीने रिंकु राजगुरु रातोरात स्टार झाली अन असंख्य प्रेक्षकांच्या मनात तिने आपली जागा निर्माण केली. सैराटमध्ये गावरान बाज असलेली भुमिका करताना रिंकुने स्वत:ला अक्षरश: आर्चीमध्ये पुर्णपणे परावर्तीतच केले होते. तिची डायलॉग म्हणण्याची स्टाईल असो, किंवा झिंगाट डान्स रिंकुच्या अभिनयावर प्रेक्षकच नाही तर आज हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील फिदा झाले आहेत. सलमान खान, आमीर खान, माधुरी दिक्षित यासारख्या कलाकारांनी अभिनयाचे कौतुक केलेली रिंकु आता आपल्याला एकदमच वेगळ््या लुकमध्ये पहायला मिळत आहे. सैराट चित्रपट प्रदर्शित झाल्यापासुन रिंकु सगळीकडेच टिपिकल आर्चीच्या लुकमध्ये दिसत होती. सलवार-कुरता, ओढणी, केसांची वेणी अशाच अंदाजात तिला सर्वांनी आत्तापर्यंत पाहिले होते. परंतू आता या सैराट गर्लने कात टाकली असुन ती आपल्याला वेगळ््या लुकमध्ये दिसुन येत आहे. व्हाईट कलरचा सिल्क पंजाबी गळ््यात स्टायलीश ओढणी, मोकळे केस अन मेकअपचा टच देऊन रिंकु मॉर्डन लुकमध्ये आली आहे. तिच्या या पेहरावाला सोशल मिडीयावर लाईक्स मिळतच आहेत. परंतू प्रश्न असा पडलाय की रिंकुचा हा मेकओवर फक्त चेंज म्हणुन आहे की कोणत्या नव्या चित्रपटातील भुमिकेसाठी हे मात्र अजुन तरी गुलदस्त्यातच आहे.