तेजस्विनी पंडित (Tejasswini Pandit ) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) या दोघींच्या ‘रानबाजार’ (RaanBaazaar ) या आगामी वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. मराठीतील आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड वेबसीरिज म्हणून या सीरिजकडे पाहिलं जातंय. कारणही तसंच आहे. तेजस्विनी व प्राजक्ता दोघीही या सीरिजमध्ये बोल्ड भूमिका साकारताना दिसत आहेत. या वेबसीरिजचे टीझर आणि ट्रेलर आऊट झाल्यापासून तेजस्विनी आणि प्राजक्ताला सोशल प्लॅटफॉर्मवर ट्रोल केलं जातंय. या ट्रोर्ल्सना तेजस्विनी पंडिने सडेत्तोड उत्तर दिलं आहे.
लोकमत फ्लिमीशी बोलताना तेजस्विनी म्हणाली, कलाकार म्हणून मी ट्रोलिंगच्या पुढे गेली, मी माझा दृष्टाकोन बदलला आहे. त्यामुळे यासगळ्याला मी निगेटिव्हली घेत नाही. मला वाटतत नाही टीझर किंवा ट्रेलरमध्ये काही नेगिटीव्ह होतं पण ते लोकांनी नेगिटीव्ह घेतल्यामुळे ते जास्त व्हायरल झालं., पण हरकत नाही ते व्हायरल झालं म्हणून लोकांनी ते बघितलं.अभिनेत्री म्हणून मला कपडेच काढायचं असते तर ते मी कुठल्याही म्युझिकवर केलं असते. एक बोल्ड सीन बघून ट्रेलिंग करणं योग्य नाही. सीरिज बघून टीझर विसरुन जातील प्रेक्षक. आधी सिरीज बघ मग शिव्या घालाच्या आहेत कौतुक करायचं ते भरभरुन करा, असे तिनं म्हटलं.
मोहन आगाशे, उर्मिला कोठारे, आनंद जोग, वनिता खरात, मोहन जोशी, अभिजीत पानसे, सुरेखा कुडची, वैभव मांगले, सचिन खेडेकर आणि अनेक दिग्गज कलाकारांची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ट्रेलर बघता, ही केवळ एक बोल्ड कथा नाही तर या सीरिजमध्ये राजकीय थरार पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट होतं. ट्रेलरमधील संवाद जबरदस्त आहेत. कलाकारांचा अभिनयही तितकाच जबरदस्त आहे.
'त्या' दोघींमुळे राजकारणात आणलेल्या वादळाची रंजक गोष्ट! 'रानबाजार'... नवी कोरी वेबसीरीज पाहा फक्त प्लॅनेट मराठीवर. अॅप इन्स्टॉल करा आत्ताच!अँड्रॉईड युजर्ससाठी >> https://bit.ly/3wCnSPx आयफोन युजर्ससाठी >> https://apple.co/39Z5cBS