Join us

​विश्वास मुदगल लिहितोय ‘सायफाय ट्रीओलॉजी’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2016 2:14 PM

स्टार्टअप्सचा सध्या ट्रेंड आला आहे. तरुण व्यावसायिक नोकरी करण्याऐवजी स्वयंउद्योजक होण्यास प्राधान्य देत आहेत. अशा स्वप्नाने झपाटलेल्या विश्वास मुदगलनेदेखील ...

स्टार्टअप्सचा सध्या ट्रेंड आला आहे. तरुण व्यावसायिक नोकरी करण्याऐवजी स्वयंउद्योजक होण्यास प्राधान्य देत आहेत. अशा स्वप्नाने झपाटलेल्या विश्वास मुदगलनेदेखील स्वत:चा बिझनेस सुरू केला.परंतु यश प्रत्येकालाच मिळेल असे नाही. 2007 साली त्यांचे ‘जॉबईहाईव्ह’ नावाचे वेबपोर्टल दिवाळखोरीत निघाले आणि विश्वास आयुष्याच्या सर्वात लो पॉर्इंटवर येऊन पोहचला.या निराशेत त्याने मोटारसायकलवरून भारत भ्रमंती सुरू केली आणि आयुष्य बदलून टाकणारी संकल्पना त्याला सुचली. या प्रवासावर आधारित त्याने ‘लूझिंग माय रिलेजन’ नावाचे पुस्तक लिहिले आणि ते वाचकांच्या पसंतीस उतरले.हिंदी आणि कन्नड भाषेत ते भाषांतरितसुद्धा झाले. तो म्हणतो, दिवाळखोर ते बेस्ट सेलर लेखक या प्रवासात मी एक गोष्ट शिकलो आहे आणि ती म्हणजे ‘अपयश’ आपल्याला थांबवू नाही शकत. उलट अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देते.‘गुडवर्कलॅब्स’चा सहनिर्माता असलेला विश्वास आता तीन सायन्स फिक्शन कादंबऱ्यांवर काम करत आहे. भविष्यातील तिसऱ्या महायुद्धा दरम्यान याचे कथानक घडते. सुपर ह्युमन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेल्या मशीन्स यांचा समावेश त्यामध्ये असणार आहे.याबद्दल तो सांगतो, या कादंबऱ्यांचा पट खूप मोठा आहे म्हणून ती ट्रीओलॉजी लिहिण्याचे ठरवले. एका कादंबरीत सर्व गोष्ट सांगणे शक्य नव्हते. यावर आधारित व्हिडिओ गेम तयार करण्याचासुद्धा माझा विचार आहे.