Join us  

प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा जावई आहे प्रसिद्ध सेलिब्रेटी, जाणून घ्या त्याच्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 7:00 AM

Sadashiv Amrapurkar : दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी अनेक चित्रपटात रंगवलेला खलनायक प्रेक्षकांना चांगलाच भावला. सदाशिव अमरापूरकर यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारसे कुणाला माहित नाही.

मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर (Sadashiv Amrapurkar) यांनी अनेक चित्रपटात रंगवलेला खलनायक प्रेक्षकांना चांगलाच भावला. सडक या चित्रपटातील त्यांची महाराणीची भूमिका खूप गाजली होती. या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. त्यांनी त्यांच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले. सदाशिव अमरापूरकर यांनी प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्षे अधिराज्य केले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सदाशिव अमरापूरकर यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारसे कुणाला माहित नाही. सदाशिव अमरापूरकर यांचा जावई सेलिब्रेटी शेफ असून त्यांचे नाव आहे देवव्रत जातेगावकर (Devwrat Jategaonkar).

सदाशिव अमरापूरकर आणि सुनंदा अमरापूरकर यांना तीन मुली केतकी, सायली आणि रिमा. केतकी हिचा नवरा देवव्रत जातेगावकर सेलिब्रेटी शेफ आहे.

​झी मराठीवरील आम्ही सारे खवय्ये या शोमध्ये शेफ देवव्रत जातेगावकर झळकले होते. रुचकर पदार्थ बनवणे आणि ते तितक्याच आकर्षकतेने सजवणे ही त्यांची खासियत खवय्येच्या शोमध्ये पाहायला मिळाली होती. मरा​​ठी सृष्टीतील सेलिब्रिटी शेफ अशी त्यांची ख्याती आहे. २०१२ साली जर्मनी मध्ये झालेल्या कलनरी ऑलिम्पिक मध्ये देवव्रत यांनी भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते. प्रसिद्ध कथालेखक आणि कादंबरीकार आनंद जातेगावकर यांचे ते सुपूत्र आहेत.

सदाशिव अमरापूरकर यांचे २०१४ साली किडनीच्या विकाराने निधन झाले. त्यावेळी मराठीसह बॉलिवूड सृष्टीने हळहळ व्यक्त केली होती. अभिनयाच्या त्यांच्या प्रवासात त्यांनी सामाजिक बांधिलकी देखील जोपासली. विविध सामाजिक संस्थेशी ते जोडले गेले होते. मेधा पाटकर यांच्यासोबत नर्मदा आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा वेगवेगळ्या सामाजिक संस्थेशी ते जोडले गेले होते. सदाशिव अमरापूरकर यांच्या नावाने ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्ट मार्फत गरजूंना आजही मदतीचा हात दिला जातो.