दिवाळीचा फराळ विकून कोट्याधीश झालेले अनेक लोक आपल्याला दिसतात. असेच एक कुटुंब आहे ते म्हणजे गोडबोले कुटुंब. गोडबोलेंच्या फराळाला थेट विदेशातून मागणी असते. आता तर गोडबोलेंच्या दिवाळीच्या फराळाची उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. वाचून आश्चर्य वाटेल पण एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा नवरा हा सगळा कोट्यावधींचा व्याप सांभाळतो. या अभिनेत्रीचे नाव आहे किशोरी गोडबोले.
किशोरी गोडबोलेचा नवरा सचिन गोडबोले यांचे दादर येथे खास मराठी घरगुती खाद्य पदार्थाचे अर्थात फराळाचे दुकान आहे. सचिन यांच्या आई सुमती गोडबोले यांनी अगदी पाच पदार्थ विकून हा व्यवसाय उभा केला होता. त्यांचा मुलगा सचिन हा जपानमधील एका बड्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. पण वडिलांच्या निधनानंतर आईने त्याला नोकरी सोडून तिचा व्यवसाय सांभाळण्याची गळ घातली आणि मुलाने आईच्या या शब्दाखातर उच्च पदाची नोकरी सोडली.
क्लासिकल नृत्य विशारद असलेल्या किशोरीने मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडल क्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दी, एक दो तीन, खिडकी अशा विविध हिंदी मराठी मालिकेत काम केले. मेरे साई मालिकेमधील बाईजाची भक्तिभाव रुपी भूमिका प्रेक्षकांना खूप भावते आहे.