Join us

डाएट बाजूला ठेऊन लग्नाच्या पंगतीत सुव्रत मारतो 'या' पदार्थावर ताव; मधुरा बाचलच्या प्रश्नाचं उत्तर देत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 7:41 PM

Suvrat joshi: अलिकडेच अभिनेता सुव्रत जोशी याने त्याच्या आवडत्या पदार्थाचं नाव सांगितलं आहे. प्रसिद्ध युट्यूबर मधुरा बाचल यांच्या एका पोस्टचं उत्तर देताना सुव्रतने त्याच्या आवडत्या पदार्थाचं नाव सांगितलं आहे.

कलाविश्वातील प्रत्येक कलाकार त्यांच्या अभिनयासह फिटनेसकडेही तितकचं लक्ष देत असतात. त्यामुळे डाएट करणं, वर्कआऊट करणं हा त्यांच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग झालेला आहे. परंतु, कधीकधी हा डाएट चार्ज बाजूला ठेऊन ते आपल्या आवडत्या पदार्थावर चांगलाच ताव मारतात. यामध्ये अलिकडेच अभिनेता सुव्रत जोशी याने त्याच्या आवडत्या पदार्थाचं नाव सांगितलं आहे. प्रसिद्ध युट्यूबर मधुरा बाचल यांच्या एका पोस्टचं उत्तर देताना सुव्रतने त्याच्या आवडत्या पदार्थाचं नाव सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी मधुरा रेसिपीजच्या मधुरा बाचल यांनी इन्स्टाग्राममवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तुम्हाला लग्नाच्या पंगतीतला सर्वात जास्त आवडता पदार्थ कोणता असा प्रश्न विचारला होता. त्यावर अनेकांनी आपल्या आवडत्या पदार्थाचं नाव सांगितलं. मात्र, या सगळ्यात सुव्रतने केलेली कमेंट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

मधुराच्या पोस्टवर कमेंट करत सुव्रतने त्याच्या आवडत्या पदार्थाचं नाव सांगितलं आहे. इतकंच नाही तर लग्नाच्या पंगतीत तो त्या पदार्थावर हमखास ताव मारतो असंही त्याने म्हटलं आहे.

सुव्रतला आवडतो 'हा' पदार्थ

अभिनेता सुव्रत जोशी या अळूची भाजी प्रचंड आवडते. त्यामुळे लग्नातील पंगतीत कधीही अळूची भाजी असेल तर त्यावर ताव मारणं तो सोडत नाही. सुव्रत आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि तितकाच अभ्यासू अभिनेता म्हणून ओळखला जातो. सुव्रत हा अभिनेत्री सखी गोखलेचा पती तर शुभांगी गोखले यांचा जावई आहे. सुव्रत आणि सखी यांची दिल दोस्ती दुनियादारीच्या सेटवर ओळख झाली आणि ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली. विशेष म्हणजे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी 11 एप्रिल 2019 रोजी लग्नगाठ बांधली. 

टॅग्स :सुव्रत जोशीसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा