Join us  

'जब्या मोठा गेम झाला रे....', 'फँड्री' फेम राजेश्वरी खरातनं शेअर केला 'तो' फोटो, नेटकऱ्यांच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 7:42 PM

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या २०१३ साली आलेल्या 'फँड्री' सिनेमाची आजही चर्चा होताना दिसते.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या २०१३ साली आलेल्या 'फँड्री' सिनेमाची आजही चर्चा होताना दिसते. या सिनेमातील कलाकार हे एका रात्रीत स्टार झाले.   फँड्री चित्रपटातून सोमनाथ 'जब्या'च्या तर राजेश्वरी 'शालू'च्या भूमिकेतून ही जोडी घराघरात पोहोचली होती.  सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात यांनी त्यांच्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ घातली होती. खऱ्या आयुष्यातही दोघांच्या रिलेशनच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, आता यातच एक फोटो समोर आला आहे, ज्यावरुन शालू ही जब्याला नाही तर एका दुसऱ्याचं तरुणाला डेट करत असल्याचं दिसून येत आहे. 

शालू ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतेच तिनं तिच्या रिअल लाइफ जब्याबरोबरचा रोमँटिक फोटो पोस्ट केलाय. आता तिनं शेअर केलेला एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती रोहन गवई या तरुणासोबत दिसून येत आहे. फोटो शेअर करताना तिनं लाल रंगाचा हार्ट इमोजी पोस्ट केलाय. यावरून शालू अर्थात राजेश्वरी या तरुणाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. 

नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोवर 'जब्या मोठा गेम झाला रे....', 'जब्यासाठी ३ मिनिटं मौन', 'गुलिगत धोका', अशा कमेंट केल्या आहेत. काही दिवसांपुर्वी  राजेश्वरीने जब्या अर्थात सोमनाथ सोबतचे फोटो शेअर केले होते. यावरुन दोघे लग्न करणार असल्याचंही बोललं जातं होतं. दरम्यान, राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा होताना दिसते. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.  

टॅग्स :राजेश्वरी खरातसेलिब्रिटीमराठी अभिनेतानागराज मंजुळे