हिंदी चित्रपटांसोबतच नाटक, मालिका आणि वेबसीरिज अशा सर्वच क्षेत्रात ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही सर्वांची लाडकी अभिनेत्री. तुमच्या आमच्या याच लाडक्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आणि या फोटोंवर कमेंट्सचा नुसता पाऊस पडला. होय, चाहत्यांनी प्रियाच्या फोटोवर अशा काही भन्नाट कमेंट्स केल्यात की, तुम्हाला हसू आवरणार नाही.प्रियाने नुकताच तिचा एक क्यूट हसरा फोटो इन्स्टावर शेअर केला. पण हा फोटो शेअर करताना त्याला कॅप्शन काय द्यावं, हे काही तिला सुचेना. मग काय? तिने चाहत्यांनाच कॅप्शन सुचवण्याची विनंती केली.
‘ मला हा फोटो खूप आवडला आहे पण कॅप्शन काही सुचेना..तुम्हाला काय सुचली तर सांगा..,’ असं तिनं या फोटोसोबत लिहिलं. तिनं कॅप्शन सुचत नाहीये, म्हणायची देर की, चाहत्यांनी एक ना अनेक कॅप्शन सुचवली. तेही एकापेक्षा एक भन्नाट.
साधारण पाच वर्षांची असता पासून प्रियाने अभिनयाला सुरूवात केली आहे. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक नावाच्या शाळेच्या नाटकात तिने म्हातारीची भूमिका केली होती. या भुमिकेसाठी तिला पहिलं बक्षिसही मिळालं होतं. तेव्हा अभिनेत्री म्हणून करिअर वगैरे करण्याचा विचार तिच्या मनात देखील नव्हता. अभिनय म्हणजे काय हे फार कळतंही नसताना फक्त आपल्या कामाचं कौतुक होतंय, सर्वांना आवडतंय यातच आनंद मानून तिने आपला अभिनयाचा प्रवास सुरू ठेवला.
प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांनी सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नगाठ बांधली. प्रिया आणि उमेश एकाच क्षेत्रात असल्यानं दोघंही चांगले मित्र होते. सहा वर्षांच्या रिलेशिपनंतर येथेही प्रियानेच पुढाकार घेऊन उमेशच्या वाढदिवशी तिने लग्नासाठी उमेशला प्रपोज केलं. 2011 साली या दोघांनी लग्न केलं. आज ही जोडी मेड फॉर इच अदर म्हणून ओळखली जाते.