कोरोना व्हायरसने देशभरात थैमान मांडले आहे. या व्हायरसमुळे अनेक लोकांचा बळी गेला आहे. त्यात या व्हायरसशी लढण्यासाठी बरेच कलाकार पुढे सरसावले आहेत. बऱ्याच कलाकारांनी पैशांची मदत केली आहे तर कुणी प्रवासी मजूरांना त्यांच्या घरी पोहचण्यासाठी पुढे सरसावले आहेत. फर्जंद, फत्तेशिकत्त चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे दिग्पाल लांजेकर या संकटाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. पुण्यातील घरोघरी जाऊन डॉक्टरांसोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांची तपासणी वऔषध वाटप करत आहे.
दिग्पालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिग्पाल सांगतो आहे की, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की जगभरात कोविड 19चा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोना महामारीने सर्व जग त्रस्त आहे. यावर अद्याप उपाय सापडलेला नाही. पण यापासून बचाव करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. डॉक्टर ज्या पद्धतीने काम करत आहेत. ज्या पद्धतीने लढा देत आहेत. तसेच आरोग्य कर्मचारी कशा पद्धतीने लढा देत आहेत. या सगळ्यांना सलाम. या सर्व चळवळीमध्ये नागरिकांनीदेखील यावे, असे मला वाटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व पुणे महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एक मास्क स्क्रिनिंगचा उपक्रम राबविला जात असल्याचं मला कळलं. त्यांना मी अॅप्रोच झालो. या उपक्रमात सहभागी झालो.
त्याने पुढे सांगितले की, कर्वे रोड येथील एका महाविद्यालयात दोनशे लोक राहतात. त्यात डॉक्टर्स आहेत. दररोज सकाळी व दुपारी अशा दोन बॅचेसमध्ये कार्यकर्ते वस्त्यांमध्ये जातात. या कार्यकर्त्यांमध्ये सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत. वस्त्यांमध्ये गेल्यावर तिथले सामाजिक स्थळ, मंदिर, समाज मंदिर असेल तिथे पीपीई किट घालायचे. तिथे एक डॉक्टर सोबत असायचे. ते डॉक्टर टीम लीड करायचे. एक यादी बनवणार, डॉक्टर लोकांना तपासणार आणि दुसरा कार्यकर्ता औषधांचे वाटप करतो. तिथे गेल्यावर काय होईल अशी धाकधूक होत होती.
त्याने जनसेवा करताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले. तसेच इतरांनाही जनसेवा करण्याचे आवाहन केले आहे.