Join us

​ पहिलाच प्रयोग हाऊसफुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2016 2:54 PM

प्रशांत दामले म्हणजे रंगभूमीवरील दर्जेदार अभिनेते. अनेक सुपरहिट नाटके रंगभूमीला बहाल केलेले प्रशांत दामले नेहमीच प्रेक्षकांसाठी नवीन काहीतरी घेऊन ...

प्रशांत दामले म्हणजे रंगभूमीवरील दर्जेदार अभिनेते. अनेक सुपरहिट नाटके रंगभूमीला बहाल केलेले प्रशांत दामले नेहमीच प्रेक्षकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येतात. सध्या त्यांचे साखर खालेल्ला माणुस हे नाटक रंगभूमीवर नाट्यरसिकांच्या पसंतीस उतरत आहे. नुकताच या नाटकाचा शुभारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी नाटकाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिल्याने प्रशांत दामलेंनी प्रेक्षकांचे सोशल साईट्सवर आभार मानले आहेत. या नाटकामध्ये आपल्याला प्रशांत दामलें सोबतच आघाडीच्या अभिनेत्री शुभांगी गोखले, रुचा आपटे, संकर्षण कºहाडे पाहायला मिळत आहेत. एकदंतची निर्मिती असलेले हे नाटक प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन यांनी सादर केले आहे. नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आहेत. तसेच विदयासागर अध्यापक यांनी हे नाटक लिहिलेले आहे. प्रसिदध संगीतकार अशोक पत्की यांचे संगीत या नाटकाला आहे. या नाटकाविषयी बोलताना प्रशांत दामले सांगतात, प्रेक्षकांची नेहमीच नाटकाप्रती विश्वासार्हता राहिली आहे. त्यामुळे नोटाबंदी असली तरी त्यांना कार्ड, चेक्स, स्वाईप मशिन्स असे अनेक पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले होते. आमच्या नाटकाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याने आमची टिम खुष आहे. या नाटकाचे नाव पाहता यामध्ये नक्कीच काहीतरी धमाल, विनोदी आपल्याला अनुभवण्याची संधी मिळत आहे. सध्या नोटा बंदीच्या त्रासामुळे अनेक नाटकांचे प्रयोग पुढे ढकलण्यात आले आहेत परंतू अशात देखील या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाला प्रेक्षकांनी हाऊसफुल्लच्या पाट्या झळकविल्या आहेत.