मराठीतील पहिली हॉरर फिल्म
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2016 4:54 PM
मराठी सिनेमाला ‘अच्छे दिन’ आलेले आहेत. एकाहुन एक सरस सिनेमे मराठीत तयार होत आहेत. विषयाचे वैविध्य, हटके कथा, उत्कृष्ट ...
मराठी सिनेमाला ‘अच्छे दिन’ आलेले आहेत. एकाहुन एक सरस सिनेमे मराठीत तयार होत आहेत. विषयाचे वैविध्य, हटके कथा, उत्कृष्ट मांडणीमुळे प्रेक्षकांच्याही मराठी चित्रपटांकडून अपेक्षा वाढल्या आहेत.ह्याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मराठीतील पहिलीवहिली हॉरर फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. ड्रामा आणि विनोदी चित्रपट रसिकांना भीतीची अनुभव देण्यासाठी दिग्दर्शक विशाल फुरिया क्लासिक हॉरर फिल्म ‘लपाछपी’ तयार करत आहे.मराठीमध्ये जास्तीत जास्त विनोदी आणि रोमॅण्टिक चित्रपट तयार होतात. हॉरर चित्रपटांना आपण कधी स्पर्शच केला नाही. सस्पेंस थ्रीलर (रहस्यपट) आणि हॉरर सिनेमात फरक असतो. अशा सिनेमाचा फार मोठा प्रेक्षकवर्ग आहे. म्हणून मराठी चित्रपटांच्या इतिहासातील पहिला हॉरर सिनेमा काढण्याचा मी निर्णय घेतला, असे विशाल म्हणाला. पूजा सावंत, उषा नाईक, विक्रम गायवाड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट उत्कृष्ट असणार याची निर्माता जितेंद्र पाटीलने ग्वाही दिली. विशाल कपूरच्या पटकथेला रंजन पटनाईक यांनी संगीत दिले आहे.