पहिलं प्रेम का असतं खास...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2016 1:41 PM
प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाला खास महत्त्व असतं. असं म्हणतात की आपलं पहिलं प्रेम कोणी विसरूच शकत नाही, ते कायमचं ...
प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाला खास महत्त्व असतं. असं म्हणतात की आपलं पहिलं प्रेम कोणी विसरूच शकत नाही, ते कायमचं आपल्या सोबत असतं, मनातल्या कोपऱ्यात लपलेलं ! त्या खास व्यक्तिबद्दल नेहमीच काहीतरी जाणून घेण्याची एक उत्सुकता मनात असते आणि एक प्रश्न मनात येतो कि ती किंवा तो सध्या काय करत असेल? ह्या उत्सुकतेला घेऊनच झी स्टुडीओजचा नवा कोरा मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ज्याचे नाव आहे 'ती सध्या काय करते'.नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना एक खास भेट देण्याचा पायंडा गेल्या काही वर्षांपासून झी स्टुडिओजने पाडला आहे. अशाच खास प्रेमाचे काही हळवे क्षण तुम्हाला अनुभवता येणार आहेत आगामी ती सध्या काय करते या चित्रपटामध्येनटरंग, टाईमपास, लोकमान्य, नटसम्राट अशा दर्जेदार कलाकृती देणाऱ्या झी स्टुडिओज् निर्मित आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित 'ती सध्या काय करते' हा चित्रपट येत्या नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच ६ जानेवारी २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरी आणि होणार सून मी या घरची मधून घराघरांत पोचलेली तेजश्री प्रधान ही जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आली आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे तसेच झी मराठी वरील सा रे ग म प लिटिल चॅम्प मध्ये आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी आर्या आंबेकर या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत हे विशेष.