Join us

आदिनाथ कोठारेला आठवली उर्मिला कानिटकर-कोठारेसोबतची पहिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 5:39 AM

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर-कोठारे हे मराठी इंडस्ट्रीतील खूपच क्यूट कपल मानले जाते. आदिनाथने उर्मिला आणि त्याच्या पहिल्या भेटीची ...

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर-कोठारे हे मराठी इंडस्ट्रीतील खूपच क्यूट कपल मानले जाते. आदिनाथने उर्मिला आणि त्याच्या पहिल्या भेटीची आठवण कवितारूपाने मांडली आहे. या कवितेचे नाव ती असून आदिनाथने पहिल्या भेटीची उत्सुकता, पहिल्या भेटीतील प्रत्येक क्षण या कवितेत टिपला आहे. ती... आम्ही कॉफी शॉपमध्ये भेटायचं ठरवलं, खूप फिल्डिंग करून हे भाग्य मिळवलं होतं मीएरवी मित्रांना, मैत्रिणींना भेटताना आपण भेटल्यावर काय बोलणार याचा जास्त विचार आपण करत नाहीपण तेव्हा मी खूप विचारात पडलो होतो,जर काही बोलताच आलं नाही तर?मी तिला इम्प्रेस करू शकलो नाहीतर?जर चुकून ती चिडून गेली तर?मग स्वतःलाच धीट बनवलं,स्वतःचीच पाठ थोपाटून स्वतःला सांगितलं;टेन्शन नही लेने का, टेन्शन देने का,माझ्या काही मोडक्यातोडक्या अनुभवातून मी थोडंफार शिकलो होतो,दुसरं कोणी आपल्याला स्वीकारावं, त्यासाठी आधी आपणच स्वतःला स्वीकारलं पाहिजे.त्यासाठी आपण स्वतःशीच खरं वागलं पाहिजे.हे असे स्वतःलाच मोठे प्रवचन देऊन, तयार झालो स्वारीसाठी.पण कदाचित कुणी माझं ऐकलं होतं, माझं मन मला न सांगता कुणाच्या कानी ओकलं होतं.तिचा मेसेज येताच जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा आभाळ दाटलं होतं.गुलाबी थंडी होती आणि प्रेमाच्या हलक्या थेबांनी सगळं जग साठलं होतं,ती शुभ्र कपड्यांमध्ये भिजत होती कॉफी शॉपच्या दारात,तिच्या व्याकुळ डोळ्यांसमोर येणाऱ्या लटांना सावरत होती त्या गार वाऱ्यात.तिला बघताच मी धावत सुटलो,रस्ता क्रॉस करून तिच्याजवळ पोहोचलो,तिने मला बघताच... डोळे हसले तिचे,खूप ठरवलं होतं, मी काय काय बोलणार तिला भेटल्यावर,कसा सटकन इम्प्रेस करीन तिला माझी पेटन्ट लाईन मारल्यावर,पण तिच्याशी नजर मिळवल्यावर... ब्लँक झालो मी!माझ्या मर्दानगीचं बेअरिंग सोडून नकळत... लाजलो मी.काही शब्द पुटपुटले... ते कसं माहीत नाही, पण फक्त तिलाच कळले.वारा अजून बेफान होऊन फिरू लागला. उसळत्या पावसात नाचू लागला,या गुलाबी वादळातून वाट काढत आम्ही कॉफीशॉपमध्ये शिरलो.एका कोपऱ्यातल्या टेबलवर बसून शेवटी बोलू लागलो.आम्ही काय काय बोललो, ते आज आठवत नाही.कशावर हसलो, तेही कळत नाही.ते क्षण फक्त आठवतात...नकळत अजूनही हसवतात...आजही आम्हाला तो वारा भेटतो कधीकधी...आजही ते ढग आमच्यावर बरसतात कधीकधी...त्यांना भेटल्यावर माझं मन त्यांना डोळा मारत हसतं.त्यांचं हे कारस्थान सफल झालं मस्त!!!आजही मी तिच्या डोळ्यात बघून... लाजतो कधी कधीआजही त्या गुलाबी वादळात, हरवतो कधी कधी...- आदिनाथ कोठारे