मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने रंगभूमीवरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपली छाप उमटविली. आम्हाला वेगळे व्हायचेय हे तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचेच नाटक खूप गाजले होते. त्यानंतर ती घडलं- बिघडलंय, पिंपळपान, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. अग्निहोत्र ही तिची मालिका तर खूप गाजली होती. छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर ती चित्रपटांकडे वळली. तिने थांग, देहभान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतरचे जोगवा, डबल सीट, मुंबई-पुणे-मुंबई यांसारखे तिचे चित्रपट प्रचंड गाजले. तिच्या जोगवा या चित्रपटाला नुकतेच दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.
मुक्ता बर्वेचा जोगवा चित्रपट २५ सप्टेंबर, २००९ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. जोगते आणि जोगतीण यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुक्ताने या चित्रपटातील फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
मुक्ताने जोगवाचा फोटो शेअर करत म्हटलं की, आज सकाळी वाचलं की जोगवा १० वर्षाचा झाला.. बापरे ..इतकी वर्ष झाली! काही projects, roles , process , त्यातली माणसं इतकी जवळची असतात की सगळ्या आठवणी कालच्याच वाटतात. Shooting चे सगळे दिवस झरझर डोळ्यासमोरून गेले. जोगवा च्या काही खास आठवणी आणि कदाचित तुम्ही न बघितलेले काही photos तुमच्यासाठी. सगळे एकत्र नाही हळु हळु share करेन.