बासरीवादक बहिणींची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2016 11:12 AM
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६४ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात बासरीवादक दोन बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६४ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात बासरीवादक दोन बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भावना देबोप्रिया आणि सुचिस्मिता असे या बासरीवादक बहिंणीची नावे आहेत. मंगेश वाघमारे यांनी या दोघींशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, आम्हा दोघींनी बासरीवादन करावे ही वडिलांची इच्छा होती. आमच्या वयात केवळ एक वर्षांचेच अंतर आहे. शाळेमध्ये असताना सुटीत आम्ही एकत्रच डबा खायचो. त्यानंतर दोघींचे गुरुही एकच असल्याने आमची वाटचाल ही बरोबरीनेच झाली आहे. त्यामुळेच आम्ही एकत्रित वादन करावे हेही निश्चितच ठरले होते. षड्ज उपक्रमांतर्गत नुकत्याच दिवंगत झालेल्या प्रसिद्ध गायिका डॉ. वीणा सहस्रबुद्धे आणि जुन्या पिढीतील संवादिनी आणि आॅर्गनवादक गोविंदराव पटवर्धन यांच्यावरील लघुपट दाखविण्यात आले. अलाहाबाद येथे आम्ही वास्तव्यास होतो. लहान असल्यापासून वडिलांनी प्रोत्साहन दिले. पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे गुरु पं. भोलानाथ प्रसाद यांच्याकडे आमचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. त्यानंतर आम्ही मुंबईला स्थायिक झाल्यानंतर पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे मार्गदर्शन लाभले. गुरूंच्या गुरूंची तालीम मिळण्याचे भाग्य आम्हाला लाभले. मुली बासरी शिकत आहेत असा भेदभाव ना गुरूंनी केला ना रसिकांनी. काही तरी वेगळे करतात, पण या मुली चांगले वादन करीत आहेत, अशीच सर्वाची भावना होती. त्यामुळे आजपर्यंतचा बासरीवादनाचा प्रवास उत्तमपणे पार पडला, अशा शब्दांत या भगिनींनी आपला कलात्मक प्रवास उलगडला. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सादरीकरण करायला मिळणे हा एका अथार्ने जीवनगौरव आहे. या क्षेत्रातील सर्वाचा आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे, असे आम्ही मानतो असेदेखील त्या यावेळी म्हणाल्या.