Join us

मराठी चित्रपट ‘आरॉन’मध्ये परदेशी कलाकारांची वर्णी !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 2:22 PM

‘आरॉन‘ नाव वाचूनच कल्पना येते की यात काहीतरी वेगळेपण असणार. अतिशय वेगळ्या धाटणीचे नाव असलेल्या या चित्रपटाचे दुसरे पोस्टर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अनावरीत करण्यात आले.

ठळक मुद्देदोन फ्रेंच कलाकारांच्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत अथर्व पाध्ये याची ‘आरॉन’ मध्ये प्रमुख भूमिका आहे

‘आरॉन‘ नाव वाचूनच कल्पना येते की यात काहीतरी वेगळेपण असणार. अतिशय वेगळ्या धाटणीचे नाव असलेल्या या चित्रपटाचे दुसरे पोस्ट रिलीज करण्यात आले. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच त्याच्या पोस्टरमध्येही वेगळेपण दिसून येते दोन परदेशी कलाकारांचे फोटो पाहून. अर्थातच ‘ते कोण?’ हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आला असणारच. या दोन फ्रेंच कलाकारांच्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. बर्नाबास तोथ व अँटोनिएट फेकेटे अशी त्यांची नावे असून या परदेशी कलाकारांबद्दल आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘जिएनपी फिल्म्स’ ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गिरीश नारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर यांनी केली असून ओमकार रमेश शेट्टी यांनी दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे. टेलिव्हिजन, नाटक व मराठी चित्रपट माध्यमांतून नावारूपास आलेले कलाकार शशांक केतकर व नेहा जोशी यात एकत्र दिसणार आहेत. तसेच ‘उंबटु’ फेम अथर्व पाध्ये याची ‘आरॉन’ मध्ये प्रमुख भूमिका आहे. त्याचप्रमाणे बंगाली चित्रपटांमधील सुपरस्टार स्वास्तिका मुखर्जी ‘आरॉन’ द्वारे मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करीत आहे. 

‘आरॉन’ या चित्रपटाची हैदराबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल व पाँडिचेरी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये आणि अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे देखील साऊथ आशियाई फिल्म फेस्टिवल मध्ये निवड झाली होती. सर्वच चित्रपट महोत्सवात ह्या चित्रपटला प्रेक्षकांनी ‘स्टँडिंग ओव्हेशन’ दिले. कॅलिफोर्निया मधील सॅन फ्रान्सिस्को मध्ये भरलेल्या द वर्ल्ड इंडिपेंडंट फिल्म फेस्टिवल मध्ये ‘आरॉन’ ला “बेस्ट इन्स्पिरेशनल फॅमिली जर्नी’’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जगभरातील चित्रपट महोत्सव गाजवून ‘आरॉन‘ आता ७ डिसेंबर २०१८ ला महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

टॅग्स :शशांक केतकर