Join us

'कायमच एकत्र चांगल्या आणि वाईट काळात..!', प्रिया बापटने तिच्या आणि उमेश कामतच्या तब्येतीची दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 12:49 IST

उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती खुद्द त्यांनीच इंस्टाग्रामवर दिली होती.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजेच उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती खुद्द त्यांनीच इंस्टाग्रामवर दिली होती. त्या दोघांच्या चाहत्यांना त्यांच्या तब्येतीची खूप काळजी वाटत होती आणि त्यांना लवकर बरे वाटावे, म्हणून प्रार्थना करत आहेत. दरम्यान आता प्रियाने त्या दोघांच्या तब्येतीची अपडेट इंस्टाग्रामवर दिली आहे.

प्रिया बापटने तिचा आणि उमेश कामतचा फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, कायमच एकत्र! चांगल्या आणि वाईट काळात. इतके प्रेम आणि सदिच्छा दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे. आमच्या दोघांच्या तब्येतील सुधारणा होते आहे. अशीच सदिच्छा देत रहा.

उमेश कामत आणि प्रिया बापटने १७ मार्च रोजी सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. उमेशने लिहिले की, दुर्देवाने प्रिया आणि माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघे होम क्वारंटाइन आहोत. आम्ही दिलेल्या सूचनेनुसार उपचार आणि काळजी घेत आहोत. कृपया मागील आठवड्याभरात आमच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः जाऊन कोरोनाची टेस्ट करून घ्यावी किंवा स्वतःला आइसोलेट करून घ्या.

उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी नुकतीच आणि काय हवे या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरूवात केली होती. ही माहिती खुद्द त्यांनीच सोशल मीडियावर दिली होती.

सध्या बॉलिवूडच्या बऱ्याच सेलिब्रेटींना कोरोनाच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. मागील काही दिवसांत अभिनेता रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, मनोज वाजपेयी, आशिष विद्यार्थी आणि तारा सुतारिया यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामतकोरोना वायरस बातम्या