Join us

मलायकाला विसरा या मराठमोळ्या अभिनेत्रीचा जीम लूक पाहा, असे ठेवते स्वतःला फिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 13:01 IST

इतकेच नाही तर माधवी फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. वयाची 35 वर्षे ओलांडलेली माधवी अतिशय सुंदर आणि फिट दिसते.

सोशल मीडियावर अभिनेत्री माधवी निमकरचे अनेक ग्लॅमरस आणि हॉट फोटो सोशल मीडियावर चाहत्यांची वाहवा मिळवत असतात. माधवी निमकरचा ग्लॅमरस अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच असतो. ऑफस्क्रीन असो किंवा ऑनस्क्रीन तिच्या प्रत्येक लूकला रसिकांची पंसती मिळते. इतकेच नाही तर माधवी फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. वयाची 35 वर्षे ओलांडलेली माधवी अतिशय सुंदर आणि फिट दिसते. माधवी चार वर्षाच्या मुलाची आई आहे. रुबेन हे तिच्या मुलाचे नाव आहे. घर आणि करिअर करताना माधवीचीसुद्धा तारेवरची कसरत सुरु असते. पण एवढ्या बिझी शेड्युलमध्येही ती स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देते आणि नियमित व्यायाम करते. तिच्या फिटनेसच्या दिनचर्येकडे ती अजिबात दुर्लक्ष करत नाही. 

योगासोबतच दररोज 45 मिनिटांचा वॉक घेते. नियमित योगा आणि चालण्यामुळे फिजिकल आणि मेंटल बॅलेन्स ठेवणे शक्य होते. व्यायामुळे मला दिवसभर प्रसन्न वाटतं असल्याचे दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.तिचे सध्याचे फोटो पाहून तुम्ही बॉलिवूड अभिनेत्रींचेही सौंदर्य विसराल. तिच्या प्रत्येक लूकवर तिचे चाहते फिदा होताना पाहायला मिळत आहेत.  

'अवघाची संसार', 'जावई विकत घेणे', 'स्वप्नांच्या पलीकडले' या मालिका आणि 'संघर्ष', 'नवरा माझा भवरा', 'सगळं करुन भागलं', 'धावाधाव', 'बायकोच्या नकळत' या सिनेमाममधूनही माधवीने रसिकांची मने जिंकली आहेत. 

टॅग्स :मलायका अरोरा