सून, लेक अशा व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी रसिकांना कधी हसवलं तर कधी टचकन डोळ्यात पाणी आणलं. माहेरच्या साडी या सिनेमातून त्या घराघरात पोहचल्या. त्यांना इतकी प्रसिद्धी मिळाली की शहरातच नाही तर खेड्यापाड्यात त्यांचा चाहता वर्ग निर्माण झाला. आजही त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकतेच अलका कुबल यांनी लोकमतच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली.
अलका कुबल म्हणाल्या की, मी आणि समीरने बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केले. त्यामुळे आमचे फ्रेंड सर्कल बनले. हळूहळू बाकीचे बाजूला झाले आणि आमची घट्ट मैत्री झाली. मग आमच्यातील जवळीक वाढत गेली. एक दीड वर्षात आमचं लग्न ठरलं. माहेरच्या साडीवेळी सगळे म्हणाले की, अगं त्यावेळी वय पण २५-२६ होते. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे योग्य वयात लग्न केले पाहिजे आणि मुले झाली पाहिजे, अशी मानसिकता होती. लग्नानंतर काम नाही मिळालं तरी चालेल. पण नशीबाने अशी वेळ आली नाही.
सासू सासऱ्यांकडून काम करण्यासाठी मिळाला पाठिंबात्या पुढे म्हणाल्या की, लग्नानंतरही मी १५ वर्षे कामात बिझी होते. तुमचं करिअर खूप छान चाललं असेल नशीबाने यश मिळत असेल. लग्नानंतरही मला सासू सासऱ्यांकडून काम करण्यासाठी खूप पाठिंबा मिळाला. बिल्डिंगमधल्या लोकांना तर त्याचे आई वडिल त्याचे सासू सासरे आहेत असे वाटायचे. एवढं माझे त्यांच्यासोबत चांगले रिलेशन होते. माझ्या सासूने सांगितलं होतं की माझी तब्येत जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत तू काम करून घे. त्यामुळे माझ्या मुलींनाही त्यांनी सांभाळलं. आज माझ्या मुली आज काही आहेत, त्यामध्ये त्यांचादेखील मोलाचा वाटा आहे. खूप प्रेमळ होत्या. घर, संसार आणि करिअरच्या बाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजते. समीर इंडस्ट्रीतला असल्यामुळे त्याचा सपोर्ट होताच.
वर्कफ्रंट
अलका कुबल सध्या छोट्या पडद्यावर कार्यरत आहेत. त्या कलर्स मराठीवरील 'हसताय ना! हसायलाच पाहिजे' या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.