Join us

'फसक्लास दाभाडे' सिनेमा 'या ठिकाणी आज पाहा अवघ्या ११२ रुपयांत, प्रेक्षकांसाठी खास ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 09:43 IST

'फसक्लास दाभाडे' सिनेमा या निवडक थिएटरमध्ये अवघ्या ११२ रुपयांमध्ये बघता येईल (fussclass dabhade)

'फसक्लास दाभाडे' सिनेमा आज संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. गेल्या काही महिन्यांपासून सिनेमाची गाणी, टीझर, ट्रेलरमुळे सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'यलो यलो', 'तोड साखळी' या गाण्यांमुळे सिनेमाची सध्या चांगलीच हवा आहे. याशिवाय गेले महिनाभर 'फसक्लास दाभाडे'ची टीम तगडं प्रमोशन करते. अशातच 'फसक्लास दाभाडे'च्या टीमने रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांसाठी खास ऑफर आणलीय.

'फसक्लास दाभाडे'ची आज खास ऑफर 

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' सिनेमा आज २४ जानेवारीला महाराष्ट्रातील थिएटरमध्ये प्रदर्शित होतोय. रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'फसक्लास दाभाडे' सिनेमा तुम्हाला अवघ्या ११२ रुपयांमध्ये बघायला मिळणार आहे. आज निवडक थिएटरमध्ये ही ऑफर दिवसभर लागू आहे. काल सिनेमातील कलाकार सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग आणि अमेय वाघ यांनी खास व्हिडीओ शेअर करुन या ऑफरचं खास सरप्राइज प्रेक्षकांना दिलं.

'फसक्लास दाभाडे'ची निवडक ऑफर या ठिकाणी

मिराज सिनेमा, मूव्ही टाइम, बालाजी सिनेप्लेक्स, राजहंस सिनेमा, गोल्ड, मॅक्सस, मुक्ता A 2, मू्व्ही मॅक्स, सिनेपोलिस या महाराष्ट्रातील थिएटर ब्रांचमध्ये ही ऑफर आज दिवसभर आहे. 'फसक्लास दाभाडे' सिनेमाबद्दल सांगायचं तर हेमंत ढोमेने हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. या सिनेमात सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, अमेय वाघ, उषा नाडकर्णी, राजसी भावे, मिताली मयेकर, हरीष दुधाडे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरअमेय वाघHemant Dhome Today Newsमराठी चित्रपट