Join us

'फसक्लास दाभाडे'चा खळखळून हसवणारा ट्रेलर रिलीज! अमेय-क्षिती-सिद्धार्थच्या केमिस्ट्रीने जिंकलं मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:48 IST

'फसक्लास दाभाडे' सिनेमाच्या ट्रेलरने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. मल्टिस्टारर असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरबद्दल जाणून घ्या (Fussclass dabhade)

गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वात एका सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. तो सिनेमा म्हणजे 'फसक्लास दाभाडे'. या सिनेमाच्या टीझर अन् गाण्यांनी प्रेक्षकांचं चांगलंच मन जिंकलंय. अशातच आज 'फसक्लास दाभाडे' सिनेमाचा भव्यदिव्य ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत पार पडला. कोणा सेलिब्रिटीच्या हस्ते नाही तर लोकांच्या हस्ते 'फसक्लास दाभाडे'च्या ट्रेलर लाँच झाला. कसा आहे सिनेमाचा ट्रेलर जाणून घ्या.

'फसक्लास दाभाडे'चा ट्रेलर रिलीज

आगामी सिनेमा 'फसक्लास दाभाडे'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये दिसतं दाभाडे कुटुंब गुण्यागोविंदाने नांदताना दिसतं. दोन भाऊ आणि एक बहीण, आई-वडील, दाजी, आजी असे इरसाल नमुने या कुटुंबात दिसतात. ट्रेलरमध्ये अनेक विनोदी प्रसंग तुम्हाला खळखळून हसवतात. ट्रेलरच्या शेवटी काही कारणास्तव भावंडांमध्ये मतभेद झालेले दिसतात. अशाप्रकारे हसवता हसवता भावुक करणारा 'फसक्लास दाभाडे'चा ट्रेलर आहे.

कधी रिलीज होणार 'फसक्लास दाभाडे'?

'फसक्लास दाभाडे' या सिनेमात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, आणि राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी सिनेमा ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.

टॅग्स :अमेय वाघसिद्धार्थ चांदेकरमराठी अभिनेतामराठी चित्रपट