Join us

'सुंदर कोकणराज..'; गारवानंतर प्रेमात पाडणारं मिलिंद इंगळेंचं नवीन गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 12:56 IST

Milind ingale: मिलिंद इंगळे यांच्या या नव्या म्युझिक अल्बममध्ये अभिनेता प्रभाकर मोरे झळकले आहेत.

मिलिंद इंगळे हे नाव घेतलं की डोळ्यासमोर गारवा हा एव्हरग्रीन प्रेमात पाडणारा म्युझिक अल्बम डोळ्यासमोर येतो. या म्युझिक अल्बममधली सगळी गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. इतकंच कशाला आजही त्यातील गाणी लोक आवडीने ऐकतात. त्यामुळे मिलिंद इंगळे यांच्या गाण्याची जादू प्रत्येक व्यक्तीच्या मनावर आहे. यामध्येच आता त्यांनी कोकणावर आधारित एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात कोकणात जाण्याचे म्हणूनच सप्तसूर म्युझिकनं कोकणाचं सौंदर्य दाखवणारा म्युझिक व्हिडिओ लाँच केला आहे. 'गारवा' फेम गायक मिलिंद इंगळे यांनी हे गाणं गायलं असून, 'आमच्या मनात एकच ध्यास, होवचो कोकण सुंदर राज' असे शब्द असलेल्या या म्युझिक व्हिडिओमध्ये प्रभाकर मोरे, वैष्णवी जोशी ही जोडी झळकली आहे.

गावच्या वेशीवरचा वेताळ, आजीच्या हातच्या घासापासून कोकणाच्या संस्कृतीचं दर्शन या म्युझिक व्हिडिओत घडवण्यात आलं आहे. म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून कोकणी जगण्याची जणू गोष्टच सांगण्यात आली आहे.

दरम्यान, साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी या व्हिडीओची निर्मिती केली असून मंगेश केरकर यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहे. तर, कृतिक माझिरे यांनी दिग्दर्शन केलं आहे. कोकणी पद्धतीनं गाऱ्हाणं मनोहर गोलांबरे यांनी घातलं आहे. 

टॅग्स :संगीतसेलिब्रिटीटिव्ही कलाकारमराठी अभिनेता