आपल्या कसदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकून घेणारे अभिनेते मकरंद अनासपुरे आणि अत्रिनेत्री राजश्री लांडगे या जोडीने अक्षरक्षः धुमाकुळ घातला. 'गाढवाचे लग्न' सिनेमात मकरंद यांनी सावळ्या कुंभाराची भूमिका साकारली होती. तर राजश्रीने त्याच्या पत्नीची म्हणजे गंगेची भूमिका साकारली होती. ही भूमिका इतकी गाजली की आजही सावळ्या कुंभाराच्या गंगेला रसिक विसरलेले नाहीत.
आजही सिनेमा त्याच उत्साहाने रसिक पाहतात आणि हसून हसून लोटपोट होतात. सा-यांची आवडती गंगेला आज रसिक त्याच भूमिकेने ओळखत असले तरी आता काळानुसार तिच्यातही बदल झाला आहे. गंगे ख-या आयुष्यात अधिक ग्लॅमरस असून तिचा गावरान अंदाज रसिकांना पसंत पडला अगदी त्याचप्रमाणे तिचा हा ग्लॅमरस अंदाज रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.
सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो पाहून चाहते घायाळ नाही झाले तरच नवल. रिअल लाइफमध्ये राजश्रीला मॉर्डन रहायला आवडतं. तिचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
इन्स्टाग्रामवर तिचे हे फोटो ग्लॅमरस असण्यासह तितकेच घायाळ करणारे सौंदर्य आहे. या प्रत्येक फोटोमधील राजश्रीची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. या सगळ्या फोटोंमध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.
असे एक नाही तर बरेच फोटो इन्स्टाग्रामवर राजश्रीने शेअर केलेत. तिचा हा बोल्ड आणि हॉट अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो आहे.