Join us

Chinmay Mandlekar : “माझ्या मुलाला कारटं का म्हणता? आणखी किती दिवस...”; चिन्मय मांडलेकरची पत्नी संतापली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 10:44 AM

Chinmay Mandlekar : चिन्मय मांडलेकरच्या पत्नीबद्दल मात्र फार कमी लोक जाणतात. चिन्मयच्या पत्नीचं नाव नेहा जोशी मांडलेकर आहे. ती एक उत्तम फोटोग्राफर आहे. सध्या मात्र चिन्मयची पत्नी नेहा जाम संतापली आहे.

अभिनेता चिन्मय मांडलेकरला(Chinmay Mandlekar) सगळेच ओळखतात. सिनेइंडस्ट्रीत त्याचा बोलबाला आहेच. मात्र, आता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील त्याने आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. चिन्मय मांडलेकरच्या पत्नीबद्दल मात्र फार कमी लोक जाणतात. चिन्मयच्या पत्नीचं नाव नेहा जोशी मांडलेकर आहे. ती एक उत्तम फोटोग्राफर आहे. सध्या मात्र चिन्मयची पत्नी नेहा जाम संतापली आहे. कारण आहे ट्रोलिंग.  

लवकरच चिन्मयचा  ‘गांधी-गोडसे : एक युद्ध’ (Gandhi Godse EK Yudh) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटात त्याने गोडसेची भूमिका साकारली आहे.  त्यामुळे काही नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका सुरू केली आहे, त्याला ट्रोल केलं जात आहे. अगदी चिन्मयला ट्रोल केलं जात असताना त्याच्या मुलालाही काही लोक ट्रोल करत आहेत. मुलाच्या जहांगीर या नावावरून त्याला डिवचलं जातेय. नेमक्या याच कारणामुळे चिन्मयची पत्नी संतापली आहे. तिने इन्स्टावर शेयर केलेली पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.  दरवेळी चिन्मयचा कोणताही नवा चित्रपट यायचा झाल्यास त्यावरुन आमच्या मुलाला ट्रोल केलं जाते. काही नेटकरी आमच्या ९ वर्षांच्या मुलाचा उल्लेख कारटं असा करतात, आता याचा कंटाळा आला आहे, अशा आशयाची पोस्ट नेहाने शेअर केली आहे. 

 या पोस्टमध्ये ती म्हणते, डिअर ट्रोलर्स, या सगळ्याचा मला आता कंटाळा आला आहे. तुम्ही  त्या ९ वर्षाच्या मुलाला आणखी किती काळ ट्रोल करणार आहात? त्याच्या वडिलांचा कोणताही नवा चित्रपट येऊ घातला की तुम्ही त्याला ट्रोल का करता? जहांगीर रतनजी दादाभाई टाटा हे काही देशद्रोही नव्हते. या महान माणसानं देशासाठी केलेलं काम अनेकांना ठाऊकही नाही. आम्ही आमच्या मुलाचं नाव त्यांच्या नावावरून ठेवलं आहे आणि आम्हाला त्याचा माेठा अभिमान आहे. पण मी हे सगळं कोणाला सांगतेय? संस्कार, संस्कृती, नेमके काय असतात? अवघ्या ९ वर्षांच्या निष्पाप मुलाचा उल्लेख ‘कारटं’ म्हणून करणारे संस्कार असतात? त्याच्या आई बद्दल वाट्टेल ते असभ्य बोलणं म्हणजे संस्कृती जपणं का? आम्ही माणुसकी..प्रेम जपणारी माणसं आहोत. माझे संस्कार आणि मूल्ये मला अशा भ्याड हल्ल्यांचा निषेध करायला शिकवतात., शब्दांत नेहाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहा फारशी प्रसिद्धी झोतात नसते. नेहा एक वाइल्ड फोटोग्राफर आहे.  सोशल मीडियावर सक्रीय असलेली नेहा चिन्मय सोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नेहाने मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री नेहा जोशी हिचे फोटोशूट केलं होतं आणि या फोटोशूटची सर्वत्र खूप चर्चा झाली होती.

टॅग्स :चिन्मय मांडलेकरमराठी अभिनेता