Ganesh Festival 2022 : बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साहाचं वातावरण आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच बाप्पाच्या भक्तीत दंग झाले आहेत. तुमच्या लाडक्या मराठी सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर घरच्या बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत. चला मग या 'सेलिब्रिटी बाप्पा'चं दर्शन घ्यायला....
दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याच्याकडे बाप्पाचे आगमन झाले आहे. बाप्पाला घरी आणताच स्वप्नीलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय आरतीचा व्हिडीओही त्याने शेअर केला आहे. स्वप्नीलच्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो. स्वप्नीलकडची बाप्पाची मूर्ती विशेष असते. पंचधातूने बनवलेली ही मूर्ती आहे.
अभिनेता सुबोध भावे याच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. सुबोधच्या घरी सुंदर देखावा तयार करण्यात आला आहे. या देखाव्याची कल्पना आणि सादरीकरण मुलांनी केलंय. आनंदी पृथ्वी आणि दु:खी पृथ्वी अशी या देखाव्याची संकल्पना आहे. यानिमित्ताने निसर्ग जपण्याची बुद्धी आणि शक्ती आपल्या अंगी येवो, अशी प्रार्थना सुबोध व त्याच्या कुटुंबीयांनी बाप्पाच्या चरणी केली आहे.
अभिनेत्री रूपाली भोसले ही विघ्नहर्त्याच्या पूजेत लीन झाली आहे. तुमच्या आयुष्यातला आनंद विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा, अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात. आयुष्य त्याच्या सोंडे इतके लांब असावे आणि आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत, अशी कामना तिने केली आहे.
अभिनेत्री वीणा जगताप हिच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले आहे. माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो, म्हणत तिने घरच्या बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत.
अभिनेता राहुल मगदूमच्या घरी सुद्धा गणराय अवतरले आहेत. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत, त्याने बाप्पाचं स्वागत केलं.
छोट्या पडद्यावरची बालकलाकार मायरा वायकुळ हिच्या घरीही बाप्पा आले आहेत. आमचा लाडका देवबाप्पा म्हणत तिने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मायरा मस्तपैकी बाप्पासाठी गाणं गाताना दिसत आहेत.
'रंग माझा वेगळा' या मालिकेने अश्विनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैशाली भोसले हिच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. गणाधीशाची स्वारी आली म्हणत तिने फोटो शेअर केले आहेत.
अभिनेता अभिजीत खांडकेकर याच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे.