मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम हंक अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. केवळ मराठीच नाही तर त्याने बॉलिवूडमध्ये काही चित्रपटात काम केले आहे. गश्मीरचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. गश्मीर सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. रविवारी गश्मीरने इन्स्टाग्रामवर ‘Ask Gash’ हे सेशन ठेवलं होतं.
नुकत्याच घेतलेल्या ‘Ask Gash’ या सेशनमध्ये गश्मीरला चाहत्याने रागाबद्दल प्रश्न विचारला. तु रागावर कसं नियत्रंण ठेवतोस, असं चाहत्याने विचारलं होतं. चाहत्याच्या या प्रश्नाला गश्मीरने अगदी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. गश्मीर म्हणाला, "माझ्या वैयक्तिक नुकसानामुळे मला अधिक सहनशील बनवलं आहे".
तर दुसऱ्या एका चाहत्याने अभिनेत्याला कंटाळा आल्यावर तो काय करतो याबद्दल विचारलं. यावर उत्तर देत गश्मीर म्हणाला,"आस्क मी हे सेशन घेतो". याबरोबरच "यशाचा सामना कसा करतोस?" या प्रश्नावर गश्मीरने "यशस्वी झालो की या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल" असं म्हटलं.
गश्मीरने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. हिंदी मालिका आणि वेब सीरिजमध्येही तो झळकला आहे. 'सरसेनापती हंबीरराव' या ऐतिहासिक चित्रपटात गश्मीर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशा दुहेरी भूमिकेत होता. गश्मीरचे वडील रवींद्र महाजनी हेदेखील ज्येष्ठ अभिनेते होते. मराठी कलाविश्वातील देखणा हिरो अशी त्यांची ओळख होती. वेगवेगळ्या भूमिका साकारुन गश्मीरने चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. गश्मीरचे वडील रवींद्र महाजनी हेदेखील ज्येष्ठ अभिनेते होते. मराठी कलाविश्वातील देखणा हिरो अशी त्यांची ओळख होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाकडे वळलेल्या गश्मीरला मात्र त्यांच्या निधनानंतर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.