Join us

रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 6:00 PM

"...तर कदाचित मी आयुष्य संपवूनही टाकलं असतं" , गश्मीर महाजनीने सांगितला 'तो' कठीण प्रसंग

मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हंक अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. मराठीबरोबरच त्याने हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाची छाप पाडली. वडील रवींद्र महाजनी यांच्या पावलावर पाऊल ठेवत गश्मीरनेही अभिनयात करिअर करायचं ठरवलं. गश्मीर अभिनयाबरोबरच त्याच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखला जातो. वडिलांच्या निधनानंतर झालेल्या ट्रोलिंगला त्याने सडेतोड उत्तर दिलं होतं. 

रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीर आणि त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. वडिलांच्या निधनानंतर त्याला कठीण काळातून जावं लागलं होतं. याचदरम्यान त्याच्या मनात जीवन संपवायचा विचार आल्याचा खुलासा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गश्मीरने केला. "वडिलांच्या निधनानंतर दोन आठवड्यांनी माझ्यात आणि आईमध्ये वाद झाले होते. तेव्हा मला खूप राग आला होता. कधी कधी तुम्हाला तुमचं आयुष्य संपवून टाकावंसं वाटतं. जर माझा मुलगा शेजारच्या बेडरुममध्ये झोपलेला नसता तर कदाचित मी आयुष्य संपवलंही असतं," असं गश्मीर गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

"आईबरोबरच्या भांडणानंतर मी टेरेसवर गेलो होतो. तेव्हा माझ्या मनात आयुष्य संपवण्याचा विचार आला होता. कारण, ते मला सहन होत नव्हतं. तेव्हा डोक्यात विचार आले की मला ५ वर्षांचा एक मुलगा आहे. मी त्याला या जगात आणलं आहे. त्यामुळे त्याला वाढवण्याची जबाबदारीही माझी आहे. पहिल्यांदा आयुष्य संपवण्याचे विचार माझ्या मनात येत होते. कधी कधी गोष्टी आपण हँडल करू शकत नाही. आणि याबाबत कोणाशी बोलूही शकत नाही," असंही गश्मीर पुढे म्हणाला.

टॅग्स :गश्मिर महाजनीरवींद्र महाजनीमराठी अभिनेता