Join us

"प्रमोशनच्यादृष्टीने फुलवंती गंडलाच होता", गश्मीर महाजनीचा खुलासा; प्राजक्तावरही झाली चिडचिड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 14:08 IST

सिनेमाच्या बाबतीत अनेक चुका झाल्या. गश्मीर म्हणाला...

मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) नुकताच 'फुलवंती' या सिनेमात दिसला. यामध्ये त्याने महापंडित शास्त्रींची भूमिका साकारली. प्राजक्ता माळीने 'फुलवंती' ही मुख्य भूमिका साकारली. प्रवीण तरडेंनी सिनेमाचं लेखन केलं होतं. तर स्नेहल तरडेने सिनेमा दिग्दर्शित केला. सिनेमातील गश्मीरच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. त्याने ती भूमिका उत्कृष्टरित्या निभावली.  नुकतंच गश्मीरने 'फुलवंती'च्या यशाचं गमक सांगितलं. यावेळी त्याने सिनेमाच्या रिलीजबाबतीत झालेल्या काही चुकाही थेट सांगितल्या. काय म्हणाला गश्मीर वाचा.

गश्मीर महाजनीने काही दिवसांपूर्वी 'मिरची मराठी'ला मुलाखत दिली. यावेळी त्याला 'फुलवंती'च्या यशाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा तो म्हणाला, "मला वाटतं तो सिनेमा मर्यादित प्रेक्षकांसाठीच बनवला होता. त्या प्रेक्षकांनी तो स्वीकारला. त्यामुळे सिनेमा चालला. माझ्याकरिता तो चाललेला सिनेमा आहे. आर्थिक गणितं सरळ मांडली तर मी निर्माती प्राजक्ताला प्रत्येक दिवशीचा खर्च विचारला होता. पहिल्या शेड्युलला १६ दिवसांसाठी ८ ते १० लाख खर्च आला.  दरबाराताली ग्रँड सीन्सचा ९ दिवसांसाठीचा प्रत्येक दिवशीचा खर्च १४-१५ लाख होता. पोस्ट प्रोडक्शन ३ कोटी, पब्लिसिटी ७५ लाख. रिलीजपर्यंत एकूण ४ ते सव्वा ४ कोटी बजेट झालं. 

तो पुढे म्हणाला, "पुण्यातल्या शनिवाड्यात घडलेली कथा, महापंडित आणि नाचणाऱ्या बाईमधलं अव्यक्त प्रेम. यात काही दोघांचे रोमँटिक सीन्स नाहीत. म्हणजे पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, वाशी, डोंबिवली, पनवेल इथले प्रेक्षक कथेला जास्त जोडले जाणार होते. बाबासाहेब पुरंदरेंचीही यामागे पुण्याई आहे. त्यांनी लिहिलेली कादंबरी अनेकांनी वाचलेली होती. पण फुलवंतीचा रिलीजचा दिवसच गंडलेला होता. नवमीला सिनेमा रिलीज झाला. सण असल्याने नवमी आणि दसऱ्याला लोकांनी सिनेमा पाहायला जायला नकार दिला होता. तो खरं तर आमचा पहिला वीकेंड होता. पण आपले हे प्रेक्षक नवमी दसऱ्याला बाहेरच पडणार नाही. तरी तो माऊथ पब्लिसिटीमुळे चालला. सिनेमाची कमाई ७ कोटींच्या घरात होती. ती तेवढीच होणार होती. नवमीच्या रिलीजची चूक झाली नसती तर कदाचित ८ कोटी कमाई झाली असती. पण तरी मर्यादित प्रेक्षकांसाठी  ४ कोटीत बनलेला सिनेमा ७ कोटी कमावतो तर तो यशस्वी आहे."

प्राजक्तावर झाली चिडचीड

सिनेमा अॅमेझॉनवरही खूप चालला. ट्रेलरच लोकांना खूप आवडला. खरं सांगायचं तर फुलवंतीची बरीच गणितं चुकलेली होती.  ११ ऑक्टोबरला सिनेमा रिलीज होता. ४ ऑक्टोबरला ट्रेलर आला. ट्रेलर किमान १५ दिवस आधी आऊट करायला हवा होता. प्रवीणचं लेखन, सिनेमॅटोग्राफी, गाणी, शास्त्री आणि फुलवंतीचं इक्वेशन हे सगळ्यांना आवडलं. लोकांना सिनेमा आवडला. तसं बघायला गेलं तर प्रमोशनच्यादृष्टीने खूप गंडलेला सिनेमा आहे. प्रमोशन जसं व्हायला हवं होतं त्यापेक्षा ६५ टक्केच झालं. ३५ टक्के कमी पडलं. अनेक गोष्टी उशिरा झाल्या. प्राजक्ताची पहिली निर्मिती त्यात तीच फुलवंती त्यामुळे तिच्यावर खूप प्रेशर होतं. पण मला तिचा अभिमान वाटतो तिने छान पुढे नेलं. प्राजक्ताची एक चूक आहे ते म्हणजे तिला वेळेचं अजिबात भान नाही. माझी प्रमोशनवेळी अनेकदा त्यावरुन तिच्यावर चिडचिड व्हायची. ती प्रत्येक ठिकाणी उशीरच लावायची. प्रमोशनला प्रोडक्शनची गाडी असते. त्यामुळे उशीर झाला  तर त्यांचा खर्च वाढतो. माझ्या चिडचिडीमुळे मग तिचं उशीरा येणं हळूहळू कमी झालं."

टॅग्स :गश्मिर महाजनीप्राजक्ता माळीमराठी अभिनेतामराठी चित्रपट